दिल्ली मुख्यमंत्री कार्यलयाच्या सोशल मीडियाचे नामांतरण
सत्ता गेली तरीही केजरीवाल वास्तव स्वीकारण्यास तयार नाहीत
13-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आपला पराभवाचा फटका बसला आहे. गेली दोन टर्म आपने दिल्लीत सत्ता मिळवली होती. मात्र आता दिल्लीकरांनी केजरीवालांच्या कामावर नाराजी दर्शवत भाजपला भरघोस मतदान करत सत्तेवर बसवले. मात्र आता आम आदमी पक्ष हा एक्स हँडेल सोडण्यास तयार नसल्याचं चित्र दिसत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अधिकृत खात्याचे नाव बदलत केजरीवाल अॅटवर्क असे नाव दर्शवत आहे. यामुळे केजरीवाल यांचे वैयक्तीत सोशल मीडिया अकाउंट असल्याचे बोलले जात आहे.
🚨Kejriwal has changed X account of @CMODelhi to Kejriwal at Work.
Almost a million follower taken for Free and will be misused by AAP.
दिल्ली दारू घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता ही लक्षात घेण्यासारख बाब आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मुख्यमंत्री झाल्या होत्या. अरविंद केजरीवाल यांच्याकडे नेहमीच दिल्लीच्या मुख्यमंत्री खात्याचे नियंत्रण होते आणि आता त्यांनी स्वत:ची जाहीरात करण्यासाठी सोशल मीडियावरील X ट्विटरचे नाव बदलल्याची चर्चा आहे.