अश्लील वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया आणि प्रेयसी निक्की शर्माच्या नात्याला ब्रेक?
सोशल मीडियावरून दोघांनी एकमेकांना केलं अनफॉलो
12-Feb-2025
Total Views |
मुंबई : रणवीर अलाहाबादियाची (Ranveer Allahabadiya) प्रेयसी निक्की शर्मा यांच्यातील नात्याला ब्रेक मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादियाने केलेल्या अश्लील विधानावर रान पेटलं होतं. त्यावरूनच आता त्याच्या प्रेयसीने त्याला सोशल मीडियावरून अनफोलो केलं असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे त्याच्या नात्याला आता फुलस्टॉप मिळाला असल्याच्या चर्चांना उधाण मिळालं. त्यांनी आपल्या नात्याला जगासमोर आणलं नाही. असे म्हटलं जातंय की, बराच काळ एकमेकांना डेट करत होते.
निक्की शर्मा आणि रणवीर अलाहाबादिया यांनी कधीच त्यांच्या नात्याची पुष्टी किंवा नकार दिला नाही. ब्रेकअपच्या माहितीबाबत दोघांनाही कोणतेही विधान केलेले नाही. राजकारणी आणि अभिनेत्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत, सर्वचजण रणवीर इलाहाबादियाने त्याच्या पालकांबद्दल अश्लील टिप्पणी केल्याबद्दल त्याच्या विरोधात उभे राहिले आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
रणवीर अलाहाबादियाचे इंस्टाग्रावर दोन खाते आहेत. एकाचे नाव एक म्हणजे @beerbiceps आणि दुसरे नाव नाव @ranveerallahbadia आहे. निक्की शर्मा @ranveerallahbadia या खात्याला फॉलो करत नाही. त्यानेही निक्की शर्माला फॉलो केलेलं नाही. मात्र @beerbiceps या खात्यावर निक्की शर्मा जोडली गेलेली आहे.