काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या परदेशी पत्नीचे आयएसआयशी संबंध?

हिमंत बिस्वा सरमा यांची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

    12-Feb-2025
Total Views |
 
Himanta Biswa Sarma
 
दिसपुर : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते गौरव गोगाई यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी काँग्रेस खासदाराचे नाव न घेता आपल्या पत्नीचे नागरिकत्व आणि तिचे आयएसआयशी असलेल्या संबंधावरील आरोपांबद्दल बोलले. यावरून आता उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे हिमंत बिस्वा सरमा यांनी मागितली आहेत.
 
 
 
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर लिहिले की, देशाची सुरक्षा अस्थिर करण्यासाठी जॉर्ज सोरोसह पैसे घेणे ही चिंतेची बाब आहे. ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचं म्हटले आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरीही ते काँग्रेस खासदार गौरव गोगाई आणि त्यांची पत्नी एलिझाबेथ कोलबर्नबद्दल बोलत असल्याचे स्पष्ट झाले. दोघांनी २०१३ मध्ये विवाह केला होता. १२ वर्षानंतर कोलनबर्नने नंतर ब्रिटन पासपोर्ट कायम आपल्याकडे ठेवला. त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले नाही असे सांगण्यात येत आहे.
 
या प्रकरणामध्ये वेगळा नियम असताना खासदाराच्या पत्नीला इतके दिवस परदेशी नागरिकत्व का रोखण्यात आले? असा प्रश्न हिमंता बिस्वा सरमा यांनी केला. आयएफएस अधिकाऱ्यांच्या परदेशी नागरिकांसोबत विवाहातील नियमांबद्दल त्यांनी सांगितले. या अंतर्गत, त्यांना परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांच्या जोडीदाराला ६ महिन्यांच्या आतमध्ये नागरिकत्व मिळाले.
 
 
 
गोगोईंची पत्नी एलिझाबेथ सध्या ऑक्सफोर्ड पॉलिसी मॅनेजमेंटसाठी काम करते. ज्यामुळे हवामानविषयक समस्यांवर काम सुरू असते. ती दिल्लीतील क्लायमेय अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क येथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणूनही काम करते.
 
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर केलेल्या आरोपांचा संदर्भ दिला. या संबंधित आरोपानुसार, सीडीकेएनचे आशिया संचालक तौकीर शेख यांच्यामार्फत एलिझाबेथ अलीचा आयएसआयशी संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. एलिझाबेथने पाकिस्तानातील नियोजन आयोगामध्ये काम केले.