आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान फोन बंद केल्यानंतर बेपत्ता

राजस्थानात शोधमोहिम सुरु असल्याची माहिती समोर

    12-Feb-2025
Total Views |
 
Aam Aadmi Party
 
नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) आमदार अमानतुल्ला खान यांच्या शोधात दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये छापे टाकले आहेत. त्यावेळी पोलीसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी त्यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. अमानतुल्लाहने तो स्वत: दिल्लीत असल्याचा दावा केला.
 
प्रसारमाध्यमानुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर अमानतुल्ला खानने फोन बंद केल्यानंतर तो बेपत्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो त्याच्या घरीही उपस्थित नव्हता. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याच्या शोधामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानात जाऊन भेट दिली. दरम्यान घटनास्थळी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. मात्र, त्याला अद्यापही अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले.
 
या प्रकरणी दिल्ली पोलिसांना संशय आहे की, काही लोक अमानतुल्लाला आश्रय देण्यात आला. अमानतुल्ला खान यांच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी दिल्ली पोलिसांनी लवकरच अमानतुल्लाला अटक करण्याचा दावा केला. यासाठी पथकेही तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे.
 
दरम्यान, अमानतुल्ला खान यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले होते. ज्यात तो फक्त दिल्लीत असल्याचा दावा करण्यात आला. त्याने आरोप केले की, दिल्ली पोलीस त्याला कधीही अटक करू शकतात. तसेच अमानतुल्लाला पळून जाण्यासाठी काहींनी मदत केली असा आरोप आहे. त्या गुन्हेगारांचाही यामध्ये समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
 
त्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले की, मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्येच आहे, मी कुठेही जाणार नाही. दिल्ली पोलिसांमधील काही लोक मला खोट्या प्रकरणामध्ये अडकवत असल्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्ली पोलीस ज्या व्यक्तीला अटक करण्यासाठी आले. त्याला अधीच जामीन मिळाला.
 
सोमवारी दिल्ली पोलिसांचे एक एक पथक जामियानगरमधील फरार गुन्हेगार शाहबाजला अटक करण्यासाठी गेले होते. दरम्यान, अमानतुल्ला आपल्या समर्थकांस घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी दिल्ली पोलिसांच्या पथकास घेरले. अमानतुल्ला आणि त्याच्यासोबत असलेल्या जमावाने आरोपीला पोलिसांच्या हतावत तुरी देवून हाकलवले.