वैभव नाईकांच्या भोवती चौकशीचा फेरा! पत्नीसह एसीबी कार्यालयात रवाना

    11-Feb-2025
Total Views |

Vaibhav Naik 
 
रत्नागिरी : उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्याभोवती सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीचा फेरा सुरु आहे. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी ते पत्नीसह चौकशीसाठी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.
  
वैभव नाईक यांना लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांनासुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, ते कागदपत्रांच्या चौकशीसाठी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
 
हे वाचलंत का? -  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर'!
 
यावेळी माध्यमांशी बोलताना वैभन नाईक म्हणाले की, "आम्ही आमच्या मालमत्तेच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. परंतू, आजसुद्धा त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉरमॅटमध्ये माहिती मागवली असून आम्ही ती माहिती भरून आणली आहे. १९९६ पासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे. मी चार विधानसभा निवडणूका लढवल्या आहे. त्यावेळी माझ्या प्रतिज्ञापत्रात मी माहिती दिली आहे. तसेच इन्कम टॅक्समध्येही माहिती दिली आहे. एखाद्याला चौकशीकरिता त्रास द्यायचा असल्यास आपण काही करू शकत नाही. परंतू, त्यांना जे सहकार्य लागेल ते पूर्ण सहकार्य मी करणार असून त्यांना हवी असलेली सगळी माहिती देणार आहे."