प्रशासनाच्या जमिनीवर मशिदीचे दोन मजलीऐवजी चार मजली अवैध बांधकाम
स्थानिक प्रशासनाकडून बुलडोझरची कारवाई
10-Feb-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात ९ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशासनाने अवैध बांधकाम मशीद मदनी पाडली. मशिदीचा नकाशा मंजूर नसल्याने आणि त्यातील काही भाग पोलीस ठाणे आणि नगरपालिकेच्या जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचे आढळून आले. यामुळे अवैध मशिदीवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली.
तक्रारीनंतर, १८ डिसेंबर २०२४ रोजी चौकशी करण्यात आली होती. तपासादरम्यान मशीद समितीने तिन्ही नोटिसांना उत्तर दिले नाही. नकाशा सादर न केल्याबद्दल प्रशासनाने मशिदीवर कारवाईची नोटीस बजावली. त्यानंतर अहिंदूंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मशिदीवरील कारवाईसाठी ८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली. स्थगिती संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, प्रशासनाने पोलीस दल आणि अनेक बुलडोझरसह हता नगरमधील मदनी मशीद जमीनदोस्त केली आहे.
संबंधित मशिदीचे बांधकाम हे १९९९ मध्ये सुरू झाले होते असे वृत्त आहे. ज्यावेळी त्याचे बांधकाम सुरू झाले त्यावेळी मशिदीच्या बांधकामासाठी दोन मजल्यांची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर कायदे आणि नियमावलीचा भंग करत त्यांनी दोन ऐवजी मशिदीत चार मजले आणि एक तळमजला बांधला. त्यानंतर लोकांनी याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेव्हा त्यांनी प्रशासनास कारवाईचे आदेश दिले आहेत.
मशिदीच्या अवैध बांधकामावर प्रशासनाचे म्हणणे आहे की, मशिदीच्या नावावर कोणतीही एक जमीन नाही. कट्टरपंथी पक्षाच्या नावावर फक्त काही अंश जमीन आहे. तर उर्वरित २३ एकर महानगरपालिकेची जमीन ताब्यात घेत मशिदीच्या बांधकामात अवैध वाढ करण्यत आली. या प्रकरणी महापालिकेने याबाबत वारंवार इशारा दिला, परंतु मुस्लिम पक्षाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे.