परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम देशातील सकारात्मक विचारसरणीचा नवा अध्याय! चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
10-Feb-2025
Total Views |
मुंबई : परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम देशातील सकारात्मक विचारसरणीचा नवा अध्याय आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. सोमवार, १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत कोणत्याही प्रधानमंत्रींनी देशातील विद्यार्थ्यांसोबत परीक्षेच्या संदर्भात चर्चा केली नाही त्यांना गरजच भासली नाही मात्र देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी,त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी तसेच…
याबद्दल बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत कोणत्याही प्रधानमंत्रींनी देशातील विद्यार्थ्यांसोबत परीक्षेच्या संदर्भात चर्चा केली नाही त्यांना गरजच भासली नाही. मात्र, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याकरिता परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सुरू केला. हा फक्त कार्यक्रम किंवा उपक्रम नाही तर देशातील सकारात्मक विचारसरणीचा नवा अध्याय आहे," असे त्या म्हणाल्या.
"निव्वळ टी-शर्ट घालून स्वतःला तरुण ही उपाधी देत तरुणांचा नेता बनता येत नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. तरुणांमध्ये कधी त्यांचा मित्र, कधी मार्गदर्शक होऊन त्यांच्यासोबत संवाद साधला तर खऱ्या अर्थाने तरुणांच्या गळ्यातील ताईत बनता येऊ शकते हे मोदीजींनी कृतीतून करून दाखवले. म्हणूनच गेली दहा वर्ष मोदीजी देशातल्याच नाही तर जगातल्या अनेक तरुणांसाठी आदर्श ठरले आहेत, असेही त्या म्हणाल्या.