Youth Festival : प्रारंभ युवा महोत्सवाने युवा महोत्सवाची शानदार सुरुवात
09-Dec-2025
Total Views |
नवी मुंबई : (Youth Festival) राजीव गांधी आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, वाशी यांच्या विद्यमाने साकारलेल्या नवी मुंबईतील सर्वात मोठ्या सामाजिक-सांस्कृतिक व उद्यमशील युवा महोत्सव “प्रारंभ नवी मुंबई” ची भव्य सुरुवात आज उत्साहपूर्ण वातावरणात झाली. उद्घाटन समारंभासाठी ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनचे उपाध्यक्ष आर. एम. केडिया व साईनाथ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. कुँवर हरिबंशसिंग यांचे प्रमुख अतिथी म्हणून विशेष उपस्थित होते.(Youth Festival) उद्घाटन प्रसंगी महाविद्यालय आवारात 15०० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी व मान्यवरांची लक्षवेधी उपस्थिती राहिली. कार्यक्रमाची सुरुवात ‘प्रारंभ’चे बॅलून—सेलिब्रेशनद्वारे करण्यात आली. त्यानंतर आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार पार पडला.(Youth Festival)
स्वागत प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बासुकीनाथ पांडे यांनी प्रारंभाची संकल्पना व प्रवास यांचा सविस्तर आढावा घेतला. सन २०१६ मध्ये प्रारंभाची सुरुवात विद्यार्थी कौशल्य विकास, स्पर्धात्मकता आणि सामाजिक बांधिलकी या उद्दिष्टांसाठी करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदाच्या स्पर्धेत २०० पेक्षा अधिक महाविद्यालयांमधील ३५०० हून अधिक विद्यार्थी ५ दिवसांमध्ये ५२ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रारंभचे प्रमुख ध्येय “Dream. Dare. Do” हे असल्याचे सांगताना डॉ. पांडे यांनी “प्रारंभची कँटीन” या सामाजिक उद्यमशीलता उपक्रमाचा उल्लेख केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक उद्यमकौशल्य विकसित करण्याची संधी मिळते; तसेच उपक्रमातून प्राप्त होणारी निधी रक्कम एचआयव्ही बाधित बालके, कर्करोग रुग्ण, गरजू मुलींचे शिक्षण व आपत्ती काळातील अन्नसाहाय्य अशा सामाजिक कार्यांसाठी खर्च केली जाते.(Youth Festival)
उद्घाटनप्रसंगी केडिया यांनी उद्योग-शैक्षणिक सहयोगाच्या महत्त्वावर भाष्य करत महाविद्यालयाच्या पुढाकारांचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सिंह यांनी महाविद्यालयीन टीमच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांचे अभिनंदन केले व सुरुवातीपासून आजवरची प्रारंभची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी अशा व्यासपीठांचा जास्तीत जास्त उपयोग करून नेतृत्व, संवादकौशल्य व व्यक्तिमत्व विकसित करावे असे त्यांनी आवाहन केले.(Youth Festival)
प्रशासन अधिकारी टी. पी. सिंह यांनी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत टीम प्रारंभचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी कु. इशिका सिंह यांनी कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. पाच दिवसांत ३०,००० पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभची कँटीन ही सामाजिक बांधिलकीला दिशा देणारी वैशिष्ट्यपूर्ण कल्पना असल्याचेही त्यांनी नमूद केले. समारंभासाठी ट्रस्टी अशाराम यादव, एच. बी. बी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हरिचंदन, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या बीना परेरा, आनंद तळारी, पूजा सोनी यांची उपस्थिती लाभली.(Youth Festival)
कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक प्राध्यापिका अनामिका सिंह यांनी तर आभारप्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका आणि प्रारंभ समन्वयक अंकिता गुप्ता यांनी केले. स्पर्धांमध्ये विजेत्यांसाठी रु. २ लाखांचे बक्षीस, प्रमाणपत्रे व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहेत.(Youth Festival) कार्यक्रमाचा समारोप १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रारंभ नवी मुंबई हा केवळ महोत्सव नसून युवा शक्तीला सामाजिक दृष्टिकोन, उद्यमशीलता, संस्कृती, सृजनशीलता व नेतृत्व विकसित करण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरले आहे.(Youth Festival)