Waste Processing : शहरात दररोज ८०० ते ९०० टन कचरा होतो जमा
डम्पिंग ग्राउंड वर टाकलेल्या कचऱ्यावर प्रोसेसिंग प्रक्रिया, निविदा फायनल
09-Dec-2025
Total Views |
ठाणे : (Waste Processing) ठाणे शहरात दररोज ८०० ते ९०० टन कचरा गोळा करून डम्पिंग ग्राउंड येथे नेला जातो, या कचऱ्यापासून खत निर्माण करणे, वाळू वेगळी करणे, प्लास्टिक वेगळे करण्याची प्रोसेसिंग (Waste Processing) लवकरच सुरु होणार असून याची निविदा देखील ठाणे महानगरपालिकेने फायनल केले आहे, तसेच दिवा आणि डायघर येथे पूर्वी टाकण्यात आलेला कचरा देखील मशीन द्वारे प्रोसेसिंग करून ती जमीन योग्य करण्यात येणार आहे.(Waste Processing)
ठाणे महानगरपालिकेचा कचरा डम्पिंग संदर्भात खूप काही वेळा आंदोलने झाले, दिवा येथे कित्येक वर्षांपासून कचरा डम्पिंग करणे सुरु होते, या ठिकाणी तर कचऱ्याचे डोंगर झाले, खाडीच्या परिसरात देखील कचरा टाकला जात होता, दिवेकरांना कचऱ्याला लागणाऱ्या आगीच्या धुरापासून श्वास घेण्यास देखील त्रास होत होता. यामुळे कित्येक दिवेकर नागरिक या कचऱ्याच्या आगीपासून निघणाऱ्या धुरापासून सुटका करा, याकरिता स्थानिक नागरिकांपासून ते पक्षाच्या वतीने आंदोलने झाले, पण ठाणे महानगरपालिकेला कचरा डम्पिंग करण्याकरिता पुरेशी जागा मिळत नसल्याने दिवा या ठिकाणी कचरा डंप करण्याचे काम सुरु होते, आता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भिवंडी येथील आतकोली येथे कचरा डम्पिंग केला जात आहे, तसेच या कचरा डम्पिंगच्या जमिनीवर वृक्षारोपण देखील करण्यात आले, दिवा या ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याची प्रक्रिया करिता प्लांट तयार करण्यात आला आहे. यामुळे आता दिवा येथील कचरा डम्पिंगचा प्रश्न मिटला असल्याचे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी सांगत आहेत.(Waste Processing)
दिवा डंम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाल्याचे वास्तव उघड झाले होते. दिव्यातील पर्यावरण हानी प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल तक्रारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने महापालिकेस १० कोटी २० लाखांची नुकसान भरपाईचे निर्देश देण्यात आले होते. ठाणे महापालिकेकडून या प्रकरणी नुकसान भरपाई रद्द होण्यासाठी एमपीसीबीकडे पुनर्विचाराची विनंती केली होती, दिवा डंम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात आला असून त्यावरील कचऱ्याचे बायोमायनिंग या शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यास सुरुवात झाली आहे. दिवा डंम्पिंग ग्राऊंडच्या परिसरामध्ये बायोडार्व्हसिटी पार्क तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेकडून ७० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे एमपीसीबीकडे १० कोटींचा दंड रद्द करण्याची विनंती ठामपा कडून करण्यात आली होती.(Waste Processing)
आतकोली परिसरात सद्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरा डम्प करण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी आता एखाद्या उद्यानाप्रमाणे चहूबाजूला हिरवळ, बांबूच्या वनाची संरक्षक भिंत आणि शेकडो कडुलिंबाची झाडे लावून आतकोलीमध्ये ठाणेकरांच्या ६० हजार मेट्रिक टन कचऱ्यावर हिरवाई फुलवण्यात आली आहे. या भागात आधीपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या वृक्षांचे संवर्धन केले जात असून येथे हरित पट्टा वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने आतकोली येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठामपाला ३४ हेक्टर क्षेत्र प्रदान केले आहे. या जागेवर घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. जागेचा विकास पालिकेमार्फत होत आहे. तसेच या क्षेपणभूमीचा आणि परिसराचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी संरक्षक भिंतीलगत बांबूचे बन आणि मध्यभागी विविध ठिकाणी हरित बेट तयार करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यामुळे आता या परिसरात हिरवळ पाहावयास मिळत आहे.(Waste Processing)
ठाणे महानगरपालिकेच्या शीळ डायघर परिसरातील डम्पिंग ग्राउंडची साठवणूक क्षमता संपली असतानाच तेथील कचरा अनेक वेळा पेटवून दिला जात होता. काही महिन्यापूर्वी ठाणे शहरात अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले असतानाच त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने भिवंडी तालुक्यातील आतकोली येथील सर्वे नंबर ४,५,१३ व १४ मधील एकूण ३४.७२ (हेक्टर आर) जागा ही ठाणे महानगरपालिकेस दिली. या जागेवर ठाणे पालिकेकडून सध्या दररोज १०० हून अधिक गाड्यांमधून हजारो टन कचरा टाकला जात आहे.(Waste Processing)
या आतकोली जवळील भागात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे गोदाम असल्याने गोदाम हब म्हणून ओळखला जातो. या डम्पिंग ग्राउंडच्या काही अंतरावरच ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालय बनवण्यात येत आहे. तर एक किलोमीटर अंतर परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणारे पिसे धरण आहे. ठाणे महानगपालिकेच्या वतीने आतकोली या ठिकाणी आता एकमेव डम्पिंग ग्राउंड बनवण्यात आले असून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येऊन सुगंधी फुल झाडे देखील लावण्यात आली आहेत. यामुळे हा परिसर संपूर्ण हिरवळ झाला असून कचरा डम्पिंग असून देखील या परिसरात हिरवळीने डम्पिंग ग्राउंड परिसर हरित झाले आहे. शहरातील कचरा डम्पिंग करून त्यावर पुन्हा प्रक्रिया करून कचऱ्या पासून खत निर्माण होईल, याकडे जास्त लक्ष दिले जात आहे, तसेच ठाण्याचा कचरा आतकोली येथे डम्प केला जात असल्याने कचरा डम्पिंगचा प्रश्न मिटला असल्याचे दिसत आहे. (Waste Processing)
शहरामध्ये १० मेट्रिक टन, ८० ते ८५ मेट्रिक टन असे डी सेंट्रलाइज प्रोसेसिंग (Waste Processing) प्लांट डायघर, दिवा आणि आतकोली या ठिकाणी सुरु आहेत, या ठिकाणी दिवसाला ८०० ते ९०० टन पेक्षा जास्त कचरा जातो, यामध्ये दिवा आणि डायघर येथे ८० ते ८५ मेट्रिक टनचे प्रोजेक्ट सुरु आहेत यामध्ये उरलेला कचरा आपण आतकोली येथे घेऊन जातो. आतकोली (भिवंडी ) येथे आपण प्रोसेसिंग प्लांट देखील तयार करणार आहोत. याची देखील निविदा प्रक्रिया आता झालेली आहे.(Waste Processing) भंडारली आणि दिवा येथे पूर्वी जो कचरा टाकलेला होता, त्या कचऱ्यावर देखील प्रोसेसिंग करणे सुरु आहे, याची निविदा देखील फायनल झालेली आहे ते देखील लवकर सुरु होणार आहे. जो कचरा टाकलेला आहे, त्यामध्ये तीन भाग असतात यामध्ये खत वेगळे होते, वाळू वेगळी होते आणि प्लास्टिक वेगळे होते आणि ती जागा पुनः व्यवस्थित केली जाते.(Waste Processing)
- प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.