मुंबई : (Love Jihad) अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने लव्ह जिहाद (Love Jihad) विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी केली आहे. नंदुरबारमध्ये हिंदू जनजागृती समितीकडून जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना औपचारिक विनंती पत्रक पाठवण्यात आले. राज्यातील महिलांचे संरक्षण करण्यासाठी आणि वाढत्या प्रकरणांना रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. (Love Jihad)
त्यांनी सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राज्यात कथित लव्ह जिहादची (Love Jihad) प्रकरणे स्वतंत्रपणे नोंदवली जावीत आणि त्याची चौकशी करण्यासाठी एक विशेष पोलिस शाखा स्थापन करावी, जेणेकरून अशा प्रकरणांचा अधिक प्रभावी आणि पद्धतशीरपणे तपास करता येईल. महिलांच्या सुरक्षेसाठी मजबूत कायदा बनवण्याचा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. (Love Jihad)
यावेळी नंदुरबारमधील अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी होत्या. त्यामध्ये रणरागिणी समिती, श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष ट्रस्ट, हिंदू सेवा सहाय्य समिती, वारकरी संप्रदाय, श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदू विधिज्ञ परिषद, हिंदुत्व संघटन समिती, तसेच अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. (Love Jihad)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.