Starlink High-Speed Net : स्टारलिंकच्या हायस्पीड नेटची भारतात प्रतीक्षा कायम

वेबसाइटवरील ‘ग्लिच’मुळे निर्माण झाला गोंधळ

Total Views |
Starlink High-Speed Net
 
मुंबई : (Starlink High-Speed Net) भारतामध्ये स्टारलिंक (Starlink High-Speed Net) सेवा सुरू होणार का? होणार असल्यास कधी? आणि किती किमतीत? या प्रश्नांची गेल्या काही दिवसांत ऑनलाइन जगात मोठी चर्चा रंगली होती. कारण काहीकाळ स्टारलिंकची इंडिया वेबसाइट (Starlink High-Speed Net) काही वापरकर्त्यांना लाईव्ह दिसू लागली आणि त्यावर भारतासाठीच्या इंटरनेट प्लान्स आणि मासिक शुल्कांची माहितीही झळकू लागली होती. मात्र काही तासांतच स्टारलिंकने (Starlink High-Speed Net) स्पष्ट केले की, ही माहिती वास्तविक नाही आणि जे काही दिसत होते ते फक्त डमी टेस्ट डेटा होता. वेबसाइटवरील माहिती ‘लाइव्ह’ झाल्याचा भास निर्माण करणारा हा एक कॉन्फिगरेशन ग्लिच होता.(Starlink High-Speed Net)
 
टेक जगतातील सर्वात चर्चित कंपन्यांपैकी एक असलेल्या स्टारलिंकच्या वेबसाइटवर (Starlink High-Speed Net) अचानक भारतीय किंमती दिसू लागल्याने सोशल मीडिया गजबून गेला. अनेकांनी प्लान्सचे स्क्रीनशॉट शेअर केले, तर काहींनी स्टारलिंकच्या संभाव्य लाँच होण्याच्या तारखाही सांगून टाकल्या. पण स्टारलिंकने(Starlink High-Speed Net) दिलेल्या अधिकृत निवेदनाने संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली. यात असे सांगण्यात आले आहे की, “स्टारलिंक इंडिया वेबसाइट (Starlink High-Speed Net) सध्या लाईव्ह नाही. भारतातील ग्राहकांसाठी किंमत किंवा सेवा उपलब्ध नाही. जे आकडे दिसले ते टेस्टिंगदरम्यानचे डमी डेटा होते.”(Starlink High-Speed Net)
 
हेही वाचा : पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन
 
भारतात स्टारलिंकची (Starlink High-Speed Net)सुरू होण्याच्या अपेक्षेने अनेक वापरकर्ते उत्साहित झाले होते. परंतु कंपनीने यावर पडदा टाकत सांगितले की, यासाठी भारतीयांना आणखी काळ काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्टारलिंकने भारतात कोणताही व्यावसायिक प्लॅन लॉन्च केलेला नाही.(Starlink High-Speed Net)
 
स्टारलिंक बिझनेस ऑपरेशनच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयेर यांनी स्पष्ट केले की, स्टारलिंक इंडिया वेबसाइट (Starlink High-Speed Net) अद्याप लाइव्ह नाही. भारतातील ग्राहकांसाठी सेवेची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही आणि आम्ही भारतातील ग्राहकांकडून ऑर्डर स्वीकारत नाही. एक कॉन्फिगरेशन ग्लिच झाला होता, ज्यामुळे काही वेळासाठी डमी टेस्ट डेटा दिसू लागला, परंतु त्या आकड्यांचा भारतातील स्टारलिंक सेवेच्या वास्तविक किमतीशी कोणताही संबंध नाही. हा ग्लिच त्वरित दुरुस्त करण्यात आला. आम्ही भारतातील लोकांना स्टारलिंकच्या हाय-स्पीड (Starlink High-Speed Net) इंटरनेटशी जोडण्यासाठी उत्सुक आहोत आणि आमच्या टीम्स सेवा आणि वेबसाइट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतिम सरकारी मंजुरी मिळवण्यावर केंद्रित आहेत.(Starlink High-Speed Net)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.