मुंबई : (Arshad Madani) लोकसभेतील वंदे मातरमवरील चर्चेनंतर जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद मदनी (Arshad Madani) यांनी सोमवारी चिथावणीखोर वक्तव्य केले. ते म्हणाले की, आम्ही मुस्लिम एकाच देवावर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही अल्लाहशिवाय कोणाची उपासना करीत नाहीत आणि करणारही नाही. मरण पत्करू पण आम्ही वंदे मातरम् गाणार नाही.(Arshad Madani)
मिळालेल्या माहितीनुसार, मदनींनी (Arshad Madani) एक्स वर एक लांब पोस्ट लिहित वंदे मातरमला विरोध केला आहे. त्यांनी लिहले की, वंदे मातरमचे पठण किंवा गायन करण्यास आम्हाला कोणतीही हरकत नाही, परंतु मुस्लिम केवळ एकाच अल्लाहची उपासना करतात आणि त्यांच्या उपासनेत अल्लाहशिवाय इतर कोणाचा समावेश करू शकत नाहीत.(Arshad Madani)
त्यांनी पुढे लिहले आहे की, वंदे मातरमच्या चार श्लोकांमध्ये देशाची तुलना देवता म्हणून दुर्गा मातेशी केली आहे आणि उपासनेचे शब्द वापरले गेले आहेत. हे कोणत्याही मुस्लिमाच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे. देशावर प्रेम करणे ही एक वेगळी गोष्ट आहे, त्याची पूजा करणे ही एक वेगळी गोष्ट आहे. आम्ही मृत्यू स्वीकारू परंतु कधीही दुसऱ्या देवाची उपासना करणार नाही.(Arshad Madani)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.