मुंबई : (Road Cable Stayed Bridge) मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भारतातील सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज (Road Cable Stayed Bridge) उभारण्यासाठी ॲफकॉन्सचे अभियंते सह्याद्रीच्या त्याच प्रदेशात निसर्गाशी झुंज देत आहेत, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनेला पराभूत केले होते. साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या सह्याद्री पर्वतरांगांत उंबरखिंडच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघल सैन्यावर विजय मिळवला होता त्याच पर्वतरांगा आज पुन्हा एका नव्या लढ्याचे साक्षीदार बनत आहेत. मात्र त्या तलवारीऐवजी आता पोलाद, केबल आणि काँक्रीट या साधनांच्या बळावर ऊन, वारा, पाऊस, उंची आणि वेळ मर्यादा या घटकांशी लढत देत आहेत.(Road Cable Stayed Bridge)
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चावणी गाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मूठभर मावळ्यांनी ३०,००० मुघल सैनिकांना मात दिली. त्याच ठिकाणी आज ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अभियंते इतिहासातून प्रेरणा घेऊन भारतातील सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज (Road Cable Stayed Bridge) उभारत आहेत. हा ब्रिज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रोजेक्टचा भाग असून जमिनीपासून तब्बल १३२ मीटर उंच असेल. हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर एक्सप्रेस वे वरील प्रवास सुमारे ६ किमीने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ सुमारे २५ मिनिटांनी कमी होईल.(Road Cable Stayed Bridge)
मात्र या प्रकल्पाचा प्रवास सोपा नाही. २०२६ मध्ये पूर्ण होणारा हा ब्रिज (Road Cable Stayed Bridge) सह्याद्रीच्या अतिशय कठीण आणि ऐतिहासिक परिसरात उभारला जात आहे. अरुंद कडे, तीव्र वारे, अचानक कोसळणारा पाऊस, घनदाट धुके या सर्वांचा सामना करत काम सुरू आहे. वाऱ्याचा वेग काही मिनिटांतच मंद वाऱ्यापासून ते ताशी १०० किमी वेगाने वाहतो. पावसाळ्यात, पावसामुळे सह्याद्रीच्या कडा पाण्याच्या थरात बदलतात. त्यामुळे काम तात्काळ थांबते. अचानक येणाऱ्या घनदाट धुक्यामुळे दृश्यमानता फक्त काही मीटरपर्यंत राहते. अशा परिस्थितीत बांधकाम, वेल्डिंग आणि ब्रिजचे घटक जोडण्यासारख्या कामांसाठीही अत्यंत कौशल्य, धैर्य आणि संयमाची गरज असते. उंच दऱ्यांच्या कड्यावर उभे राहून अभियंते आणि कामगार जगातील सर्वोच्च सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांनुसार काम करत आहेत. एकेकाळी शिवाजी महाराजांच्या युद्धात सहयोगी असलेली सह्याद्री पर्वतरांग आता आधुनिक भारतातील अभियंत्यांच्या कल्पकतेला आव्हान देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीतीद्वारे याच भूप्रदेशात शत्रूवर मात केली, तर अभियंते अभियांत्रिकी संरचनेच्या माध्यमातून त्यावर विजय मिळवत आहेत.(Road Cable Stayed Bridge)
हेही वाचा : Beed to Vadwani Railway Route : बीड ते वडवणी रेल्वे मार्ग स्पीड रेल्वे चाचणीसाठी सज्ज
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.