अयोध्येमध्ये श्रीरामांचे मंदिर झाले, आता मथुरेची वेळ आलेली आहे

कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचे हिंदूंना जागृतीचे आवाहन

    09-Dec-2025
Total Views |
Ayodhya
 
मुंबई : ( Ayodhya ) "अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्यामागे हिंदूंची एकता होती. त्याच एकतेतून आज तिथे भव्य मंदिर उभे राहिले आहे. हिंदूंची पवित्र ठिकाणे म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा आहेत. अयोध्येचे मंदिर झाले, आता मथुरेची वेळ आली आहे,” असे विधान सुप्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी केले. ते मथुरा शहरात ‘बजरंग दला’तर्फे काढण्यात आलेल्या शौर्य यात्रेत बोलत होते.
 
अयोध्येतील वादावर सांगितले की, "बाबर आक्रमणकारी होता. बाबरच्या विचारसरणीचे समर्थन करणारे राष्ट्रहिताचे असू शकत नाहीत आणि अशा व्यक्तींना बाबर जिथून आला होता, तिथे परत पाठवले पाहिजे. आज शौर्य दिवस साजरा करण्याचा उद्देश राम मंदिराच्या कामगिरीचे स्मरण करणे आणि मथुरेच्या संकल्पाला बळकटी देणे आहे.” त्यांनी मुर्शिदाबादमधील बाबरी प्रकरणावरदेखील प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "तिथे कोणत्याही मशिदीची पायाभरणी झाली नाही, फक्त रिबन कापण्यात आली. जर बाबरच्या नावाने कुठेही बांधकाम झाले, तर हिंदू समाज त्याचा विरोध करेल.”
 
यावेळी लोकांमध्ये धार्मिक उत्साह आणि जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी भगवान कृष्ण आणि भगवान विष्णू यांच्या वीर रूपांचे चित्रण करणारे मोठे पोस्टर्स शहरात लावण्यात आले होते. आयोजकांनी बोलताना सांगितले की, "अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर आता मथुरेतही चळवळीची दिशा निश्चित केली जात आहे.”