मुंबई : (UNESCO) छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा बहुमान मिळाल्यानंतर, आता ' दिवाळी' या सणाला सुद्धा सांस्कृतिक वारश्याचे मानांकन मिळण्याची शक्यता आहे. भारतामध्ये प्रथमच युनेस्को (UNESCO) पॅनेलच्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीची वार्षिक बैठक यंदा ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यावर होत आहे. या बैठकीत जगभरातील अमूर्त सांस्कृतिक वारशाशी संबंधित प्रस्तावांची तपासणी केली जात आहे. या सत्रादरम्यान दिवाळीला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने राजधनीमध्ये रोषणाई केली जात आहे.(UNESCO)
युनेस्कोच्या (UNESCO) आंतरसरकारी समितीची दर दोन वर्षांनी एकदा बैठक होते. या बैठकीत भारताने दिवाळीचा प्रस्ताव सादर केला आहे. सदर बैठकीमध्ये विविध देशांकडून अमूर्त सांस्कृतिक वारशासाठी एकूण ५४ प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. भारताने यंदा पहिल्यांदाच युनेस्को पॅनेलच्या उद्धाटन सत्राचे यजमानपद भूषवले असून, उद्धाटन समारंभाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, युनेस्कोचे महासंचालक खलिद अल-एनानी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भारताचे राजदूत तथा युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा उपस्थित होते. युनेस्कोने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या सत्रामध्ये अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी सदस्य राष्ट्रांनी सादर केलेल्या नामांकनांचे मूल्यांकन केले जाईल, विद्यमान घटकांच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि जगभरातील सांस्कृतिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीसाठीच्या प्रस्तावांची तपासणी केली जाईल.(UNESCO)
"युनेस्कोच्या (UNESCO) वारशा समितीचे २० वे अधिवेशन भारतात सुरू झाले आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या व्यासपीठाने १५० हून अधिक राष्ट्रांमधील प्रतिनिधींना एकत्र आणले आहे ज्यांचा उद्देश आपल्या सामायिक राहणीमान परंपरांचे संरक्षण आणि लोकप्रियता वाढवणे आहे. लाल किल्ल्यावर या संमेलनाचे आयोजन करताना भारताला आनंद होत आहे. समाज आणि पिढ्यांना जोडण्यासाठी संस्कृतीच्या शक्तीचा वापर करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचेही हे प्रतिबिंब आहे. "(UNESCO)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.