मुंबई : ( Devendra Fadnavis )चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती निमित्त चर्मकार समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्ट मंडळाची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे ६ डिसेंबर रोजी ) बैठक पार पडली त्यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्याशी समाजासंदर्भात चर्चा केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व चर्मकार समाजाच्या अस्मितेसाठी, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती महोत्सव वर्षानिमित्त शासनाकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते भरघोस स्वरूपात आणि सर्वतोपरी केले जाईल.
या वेळी संत शिरोमणी रोहिदास महाराज ६५० वी जयंती महोत्सव समितीच्या शिष्टमंडळाने राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या आखरीत असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्याचबरोबर ६५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रभर जयंती महोत्सव साजरा केला जाणार असल्याने या जयंती महोत्सवासाठी भरघोस निधी मंजूर करावा अशी मागणी करणारे निवेदनही या शिष्ट मंडळाने दिले.
चर्मकार समाजाच्या शिष्ट मंडळाच्या मागण्यांना उत्तर देताना,तसेच दादर येथील राजा शिवाजी विद्यालय येथे संपन्न होणार्या १ फेब्रुवारीला ६५० व्या जयंती महोत्सवाच्या, शुभारंभ समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना नमुद केले.यावेळी शिष्टमंडळात विजय इंगळे, रवी पेवेकर, देवराम केदार, ज्ञानेश्वर ठोंबरे, धनंजय वायंगणकर, मयूर देवळेकर, हृदयनाथ खंदारे, गुरुदेव कांबळे, मनोहर खैरे, नवनाथ शिंदे व इतर समाज बांधव उपस्थित होते.
शिष्टमंडळाने एकून २५ विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेे. त्यापैकी काही मागण्या-
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या नावे सर्व विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र असावे, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे चरित्र मा. अ. कारंडे लिखित पुनर्मुद्रण करून विक्रीसाठी उपलब्ध करणे, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे नावे दरवर्षी व्यक्ती व संस्था यांना प्रत्येकी पन्नास पुरस्कार देणे, मुंबईतील सायन रेल्वे स्टेशनला संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे नाव देणे,शालेय अभ्यासक्रमात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा पाठ समाविष्ट करणे, चर्मकार समाजासाठी नाशिक कुंभमेळ्यात स्वतंत्र मठ उपलब्ध करून देणे, शासकीय निमशासकीय आस्थापनांना व कार्यालयांना जयंती कार्यक्रम अनिवार्य करणे. आळंदी पंढरपूर नाशिक येथे भव्य समाज मंदिर उभारणे. बार्टीच्या धरतीवर लिडकॉम या महामंडळात संशोधन व विविध व्यवसाय प्रशिक्षण सुरू करणे.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ वर अध्यक्ष पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक व संचालक मंडळाच्या नियुक्त्या. चर्मकार समाजाच्या जात दाखला साठी १९५० पूर्वीची अट शिथिल करणे. चर्मोद्योग, गटई कामगारांसाठी बस रेल्वे स्थानक एसटी स्टँड मोठी जागा द्यावी तसेच स्टॉलचे परवाने द्यावेत. संत शिरोबरी रोहिदास महाराज यांच्यावर आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती करून त्याचे हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये डब करून तिन्ही चित्रपट प्रदर्शित करावेत.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.