Beed to Vadwani Railway Route : बीड ते वडवणी रेल्वे मार्ग स्पीड रेल्वे चाचणीसाठी सज्ज

मंत्री पंकजा मुंडेंनी जागवल्या वडिलांच्या आठवणी

Total Views |
Beed to Vadwani Railway Route
 
मुंबई : (Beed to Vadwani Railway Route) बीड ते वडवणी या रेल्वे लोहमार्गावर (Beed to Vadwani Railway Route) पहिली इंजन चाचणी पार पडली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता दि. १० आणि दि.११ डिसेंबर रोजी सीआरएस तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचणी (Beed to Vadwani Railway Route) केली जाणार आहे. पहिल्यांदाच या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावल्याने हा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी वडवणीसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मंत्री पंकजा मुंडे यांनी या चाचणीचा व्हिडीओ शेअर करत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या रेल्वेमार्गासाठी दिलेल्या लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला.(Beed to Vadwani Railway Route)
 
बीड पासून वडवणी हे ३० किलोमीटर अंतराचे काम पूर्ण
 
बीड जिल्हावासियांसाठी रेल्वे हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर रेल्वे धावल्यानंतर आता बीड-परळी या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. बीड पासून वडवणी हे ३० किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून रेल्वे विभागाकडून या मार्गावर चाचण्या केल्या जात आहेत. या मार्गावर रविवार,दि.७ रोजी रेल्वे इंजिन धावले.(Beed to Vadwani Railway Route)
हेही वाचा : Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena : नवी मुंबईत आंतराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन संकुल  
 
या रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होणार
 
या चाचण्यांमध्ये ट्रॅकची गुणवत्ता, उच्च वेग सहन करण्याची क्षमता, ब्रेकिंग सिस्टिम, तांत्रिक सुरक्षितता अशा विविध बाबींची सखोल तपासणी झाली आहे.(Beed to Vadwani Railway Route) चाचण्यांचे निकाल समाधानकारक आल्यामुळं पुढील टप्प्यात या मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दि.१० आणि दि.११ डिसेंबर रोजी सीआरएस तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन चाचणी होत असल्याने स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच रेल्वे ट्रॅक परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. रेल्वे ट्रॅकजवळील गावे, शेतकरी, गुरेढोरे मालक आणि स्थानिक नागरिकांना चाचणीच्या दिवशी दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.(Beed to Vadwani Railway Route)
 
बीड ते वडवणी रेल्वे मार्गावर (Beed to Vadwani Railway Route) आज पहिली रेल्वे इंजिन चाचणी यशस्वी झाली, याचा मनस्वी आनंद झाला आहे, येत्या १० व ११ डिसेंबरला स्पीड रेल्वे चाचणी होणार आहे. परळीपर्यंतचे कामही वेगाने सुरू आहे. माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि लोकनेते मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्णत्वास येत याचा मनस्वी आनंद होत आहे.(Beed to Vadwani Railway Route)
- पंकजा मुंडे, मंत्री, पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरण बदल
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.