Chhatrapati Shivaji Maharaj Terminus : सीएसएमटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

    09-Dec-2025   
Total Views |
 
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
 
नागपूर : (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
 
लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला नकार दर्शविल्याचा उल्लेख काही सदस्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उत्तर जुना आराखडा लक्षात घेऊन लोकसभेत देण्यात आल्याचे स्पष्ट केले.(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
 
हेही वाचा : World Human Rights Day : जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त अंध बालकांना जेवण वाटप!  
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात पुतळा उभारण्याची मागणी पूर्वीही करण्यात आली होती. त्यावेळी या संदर्भातील आराखडा तयार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अलीकडे लोकसभेत आलेले उत्तर हे जुन्या आराखड्याशी संबंधित असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले."(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
 
"नवीन आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) यांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असून त्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर अत्यंत भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....