Dharavi Schools Chess Championship : धारावीतील तरुण बुद्धिबळपटूंना मोठे व्यासपीठ, धारावी स्कूल्स चेस चॅम्पियनशिप - २०२५चे आयोजन

३० हुन अधिक शाळांतील २०० विद्यार्थी सहभागी होणार, प्रख्यात बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानानंद खेळाडूंशी संवाद साधणार

Total Views |
(Dharavi Schools Chess Championship)
 
मुंबई : (Dharavi Schools Chess Championship) धारावीमध्ये लवकरच बुद्धिमत्ता आणि तरुणाईचा एक प्रेरक संगम पाहायला मिळणार आहे. एनएमडीपीएल आणि अदाणी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धारावी स्कूल्स चेस चॅम्पियनशिप २०२५ (Dharavi Schools Chess Championship) ही स्पर्धा १२ डिसेंबर २०२५ रोजी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे.(Dharavi Schools Chess Championship) धारावीतील ३० हुन अधिक शाळांमधील २०० हून अधिक विद्यार्थी कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणार आहेत. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे भारताचे बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानानंद सहभागी होणार आहेत. ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत प्रदर्शनी सामने खेळतील तसेच शिस्त, एकाग्रता, चिकाटी आणि विचारशक्ती यांसारख्या जीवनमूल्यांवर मुलांशी चर्चा करतील.(Dharavi Schools Chess Championship)
 
एनएमडीपीएलच्या दृष्टीने धारावी पुनर्विकास हा केवळ भौतिक पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून नागरिकांचे राहणीमान उंचावे आणि त्यांची जीवनशैली बदलावी यासाठी राबविण्यात येणारी योजनाच आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्यांचा विकास, आत्मविश्वासाची वाढ आणि प्रगतीकेंद्रित दृष्टीकोनाची जडणघडण ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चेस चॅम्पियनशिप स्पर्धा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा उपक्रम दाटीवाटीच्या वस्त्यांमधील मुलांना समस्या सोडवण्याची क्षमता, जिज्ञासा, विश्लेषणशक्ती आणि सतत शिकण्याची वृत्ती विकसित करण्याची संधी प्रदान करतो. अशा व्यासपीठांच्या माध्यमातून एनएमडीपीएल पुढील पिढीची क्षितिजे अधिक विस्तारत असून त्यांना मोठी स्वप्ने बाळगण्यास आणि उच्च ध्येय गाठण्यास प्रेरित करीत आहे.(Dharavi Schools Chess Championship)
 
हेही वाचा : Municipal Elections : मोठी बातमी! पुढील आठवड्यात महापालिका निवडणुकींची घोषणा?  
 
धारावी स्कूल्स चेस चॅम्पियनशिप - २०२५
 
दिनांक: १२ डिसेंबर २०२५
 
स्थळ: डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब, धारावी, मुंबई
  
आयोजक: एनएमडीपीएल आणि अदाणी समूह
 
स्पर्धा गट: कनिष्ठ आणि वरिष्ठ
 
अपेक्षित सहभाग: धारावीतील ३० हुन अधिक शाळा आणि २०० हुन अधिक विद्यार्थी
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.