(छाया - डाॅ. शार्दुल केळकर)
आपल्या पूर्वजांचे नाव पुढील पिढीला देऊन त्यांची आठवण, परंपरा आणि ओळख जिवंत ठेवली जाते (sahyadri translocated tigress). हे आपण त्यांना विसरलो नाही, विसरणार नाही याचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यांचे चांगले गुण, आयुष्याची ताकद पुढील पिढ्यांत हस्तांतरीत होते, असा समज आहे (sahyadri translocated tigress). बरे, हे सगळे सांगायचे कारण म्हणजे ताडोबाच्या जंगलातील आपली लाडकी चंदा सह्याद्रीच्या खोर्यात मुक्त संचार करू लागली आहे (sahyadri translocated tigress). तुम्ही म्हणाल, पूर्वजांच्या नावाचा आणि चंदाचा काय संबंध? तर, त्यासाठी तुम्हाला याच २१व्या शतकाच्या पहिल्या दशकात ताडोबाच्या मोहर्ली भागात जावे लागेल. (sahyadri translocated tigress)
२००५-०६ पासून येडाअण्णा हा प्रबळ नर वाघ मोहर्लीपासून ताडोबाच्या मध्य भागापर्यंत प्रचंड मोठ्या भागावर अनेक वर्षे राज्य करत होता. येडाअण्णा आणि तारा यांना २००९ मध्ये चार पिल्लं झाली. त्या पिल्लांना सर्किट, ओखान, छोटी तारा आणि इमली अशी नावे देण्यात आली. त्यातील सर्किट अतिशय द्वाड होता. त्यामुळे पुढे ती सगळी ‘सर्किट गँग’ म्हणून ओळखली जाऊ लागली. २०१० मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहर्लीचा बराचसा भाग जलमय झाला होता. त्यावेळी तारा आपल्या ‘सर्किट गँग’सह ताडोबाच्या जंगलात सरकली. त्यावेळी ताडोबाच्या भागात ‘देवडोह’ नावाची मादी रहात होती. तिलाही येडाअण्णाकडून पिल्ले होती; त्यामुळे दोघींनी संघर्ष टाळला आणि एकत्र दिवस काढले. काही दिवसांनी पुराचे पाणी ओसरल्यावर तारा आपल्या मोहर्ली भागात परत आली. ‘सर्किट गँग’ साधारण २०११ पर्यंत एकत्र फिरत होती. त्यातला ‘सर्किट’ मोठा व्हायच्या आतच गेला. आईपासून विभक्त झाल्यानंतर ‘ओखान’ नियमितपणे वसंतबंधारा परिसरात दिसत असे. ते त्याचे क्षेत्र नव्हते. पण प्रौढ नर वाघ आपले क्षेत्र बनवण्याइतका बलाढ्य होईपर्यंत असे भटकत राहतात. जेव्हा ‘टायसन’ आणि ‘गब्बर’ हे दोन प्रबळ नर त्या भागात वारंवार यायला लागले होते, तेव्हा अनुभव कमी असलेल्या तरुण ‘ओखान’ला त्या भागातून निघून जावे लागले. ‘ओखान’ ब्रह्मपुरी भागात एकदा दिसल्याची माहिती आहे. पण इमली मात्र नंतर कधी दिसली नाही. नवीन आणि तरुण नर वाघापुढे निभाव न लागल्याने येडाअण्णानंतर उत्तरेला सरकला. वय वाढले, अंगावरचे घाव सहन झाले नाहीत, त्यातच त्याचा मृत्यू झाला आणि पुढे मोहर्ली भागात वाघडोह नावाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
आई तारा आणि येडाअण्णाची मुलगी म्हणजेच छोटी तारा ताडोबाच्या जामनी भागात स्थिरावली. गेल्या १२ वर्षांत (२०१३-२५) तिने गब्बर, सॅटर्न उर्फ नामदेव, काटेझरी उर्फ टायसन, मटकासूर, रुद्र, युवराज, मोगली अशा प्रबळ नर वाघांचे वंश वृद्धिंगत करताना सातवेळा पिल्लांना जन्माला घातले. ताडोबाची प्रसिद्ध वाघीण माया अचानक अदृश्य झाल्यानंतर छोटी ताराच्या मुली रोमा आणि बिजली ताडोबाच्या भागात स्थिरावल्या. छोटी ताराने आपल्या मुलीसाठी बिजलीसाठी जामनीचा भाग सोडून दिला. तिची दुसरी मुलगी रोमाने ताडोबा तलावाचा भाग आपल्या ताब्यात घेतला. छोटी ताराचे वाढते वय लक्षात घेता, तिच्या राजकन्या ताडोबाचा प्रतिष्ठेचा पांढरपौनीचा भाग ताब्यात घेऊन आईचा वारसा चालवत आहेत.
२०१६ मध्ये छोटी ताराने मटकासूरच्या दोन राजकुमारांना जन्म दिला ताराचंद आणि छोटा मटका. त्यातल्या छोटा मटकाने ताडोबाच्या ईशान्य भागात अलिझंझा, खडसंगी, नवेगाव रामदेगी परिसरात आपले राज्य स्थापन केले आणि विस्तारले. त्यानेही आपल्या आईप्रमाणे त्याच्या राण्या बबली, झरनी आणि भानुसखिंडीच्या मुलांची काळजी घेतली. त्यांना मोठे केले आणि स्थिर आयुष्य दिले. पुढे प्रादेशिक लढाईत छोटा मटका जबर जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी नैसर्गिक अधिवासातून हलवण्यात आले. चंदा ही छोटा मटका आणि झरनीची मुलगी. छोटा मटकाच्या मागे पराक्रमी बाप मटकासूर आणि आई छोटी ताराची सशक्त वंशपरंपरा होती पण झरनीही कोणी साधीसुधी नव्हती, ती ताडोबाचा अधिष्ठित सम्राट वाघडोहची मुलगी होती. चंदा आणि चांदनी दोघी बहिणी त्यांच्याच वडिलांच्या छोटा मटकाच्या राज्यात स्थिरावल्या. आईचा काही भाग त्यांनी वाटून घेतला. गेल्या महिन्यात चंदाला ‘ऑपरेशन तारा’अंतर्गत ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’त नियमानुसार आवश्यक ती गुप्तता पाळून हलविण्यात आले. ताडोबाचा हा बुलंद आवाज सह्याद्रीच्या दर्याखोर्यात घुमेल आणि सह्याद्रीची चंदा ही, ताडोबातील तारा, छोटी तारा, वाघडोह, मटकासुर, छोटा मटका यांचा पिढीजात वारसा पुढे नेत सह्याद्रीच्या जंगलालाही समृद्ध करेल, अशी आशा आहे.
- अक्षता बापट (लेखिका व्याघ्र निरीक्षक आहेत.)