CM Devendra Fadnavis : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचे नाव

संत तुकाराम महाराजांचे विचार जगनाडे महाराजांनी सर्वदूर पोहोचविले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    08-Dec-2025   
Total Views |
CM Devendra Fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) काही रुढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पाण्यात बुडविल्या, मात्र संत जगनाडे महाराज यांनीच त्या गाथा वाचवून तुकाराम महाराजांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.
 
कौशल्य व‍िकास विभागांतर्गत रामदासपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, माजी खासदार रामदास तडस म्हणून उपस्थित होते.(CM Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : वंदे मातरम् हे गीत नसून भारताच्या स्वतंत्रतेचा मंत्र
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  म्हणाले की, "महाराष्ट्राची ओळख ही भक्ती आणि वारकरी संप्रदायामुळे आहे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्र एक केला, जातीपातीमधील भेद नष्ट केले, तसेच संपूर्ण मानवजातीला एकत्रित करून भक्तीच्या मार्गाला नेण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा झरा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अनमोल कार्य संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांनी केले. म्हणूनच संतांमध्ये त्यांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन संस्थांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला," असे ते म्हणाले.(CM Devendra Fadnavis)
 
"शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमध्ये आधुनिकता आणण्याचे प्रयत्न सुरु असून संविधानाचे मंदिर तयार करण्यात आले आहेत. मोठ-मोठे उद्योग आणि शासकीय तंत्रनिकेतन यांचा एकमेकांसोबत सहयोग असायला हवा आणि उद्योगाला लागणारे मनुष्यबळ शासकीय तंत्रनिकेतनमधून तयार झाले पाहिजे, या दृष्टीने अतिशय चांगले निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने घेतले आहेत. त्यामुळे निश्चितच शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधील तरुणांना रोजगार मिळेल," असेही ते म्हणाले.(CM Devendra Fadnavis)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....