मुंबई : (Kolkata Gita Pathan) कोलकत्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर सनातन संस्कृती संसदेने हिंदूंच्या आध्यात्मिक जागृतीसाठी रविवारी गीता पठनाचा (Kolkata Gita Pathan) कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पाच लाख हिंदूंनी एकत्र येत एका सुरात गीतेचे पठण (Kolkata Gita Pathan) केले. धर्माची स्थापना करण्याचा आणि अधर्माचा अंत करण्याचा संकल्प सदैव राहणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतंभरा आणि स्वामी ज्ञानानंद उपस्थित होते. तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस हे देखील उपस्थित होते.(Kolkata Gita Pathan)
राज्यपाल म्हणाले की, आजच्या भारतामध्ये तरुण पिढीने गीतेचे पठण करणे ही राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे. आता पश्चिम बंगाल धार्मिक अहंकार संपवण्यास तयार झाला आहे. कोणतीही विशिष्ट माहिती न देता, त्यांनी फक्त असे म्हटले की, मुर्शिदाबादमध्ये काहीतरी घडताना पाहिले आहे.(Kolkata Gita Pathan)
दरम्यान बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, आज पश्चिम बंगालच्या पवित्र भूमी कोलकाता येथे पाच लाख लोकांनी एकत्रितपणे गीतेचे पठण केले. उत्साह आणि श्रद्धेचा वर्षाव पाहून असे वाटले की, जणू काही कोलकातामध्ये महाकुंभमेळा भरला आहे. सनातन ऐक्य हे या देशासाठी आणि जगासाठी शांतीचे सर्वात मोठे साधन आहे. भारतात आपल्याला 'भगवा-ए-हिंद' हवे आहे, 'गजवा-ए-हिंद' नाही.(Kolkata Gita Pathan)
या देशात बाबरी किंवा बाबराला कधीच थारा नाही - साध्वी ऋतंभरा
बेलडांगा येथे तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांच्याकडून बाबरी मशिदीची पायाभरणी करण्यात आली त्यावर, साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, या देशात बाबर किंवा बाबरीला कधीच थारा मिळणार नाही. विटांची इमारत बांधता येते, पण आक्रमणकारी बाबर हा या देशाचा कधीच होऊ शकत नाही. हे राष्ट्र रामाचे आहे. ते नेहमीच रामाचे राहील. येथे फक्त 'भगवा'च विजयी होईल. हेच शाश्वत सत्य आहे.(Kolkata Gita Pathan)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.