मुंबई : (Narendra Modi) ज्यावेळी भारताचा विकास दर २-३ टक्क्यांपर्यंत सुद्धा पोहचत नव्हता तेव्हा काही बुद्दीजीवी भारतीय अर्थव्यवस्थेला 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' म्हणत होते. परंतु आजच्या भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला मात्र ते 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ म्हणत नाहीत. ही बुद्दीजीवींची गुलामीची मानसिकता असणाऱ्या आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केला. नवी दिल्लीतील हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले की, जागतिक आर्थिक मंदी आणि अनिश्चितता असूनही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. एकेकाळी देशाच्या अर्थव्यवस्थेचा दर वाढत नव्हता, तर त्याला कारण हि आपली हिंदू संस्कृती आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्येक गोष्टीत जातीयवाद शोधणाऱ्या तथाकथित बुद्दीवाद्यांना आजच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' दिसत नाही.
ते पुढे म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासाला त्या देशाच्या असलेल्या श्रद्धेशी जोडणे हे गुलामगिरीच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. आज जगाचा विकासदर ३% आणि जी ७ देशांचा विकासदर १.५% असताना, भारत उच्च विकासदर आणि कमी चलनवाढीचा आदर्श म्हणून उदयाला आला आहे. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारताने केवळ आकडेवारीतच नव्हे तर विचार, आत्मविश्वास आणि आकांक्षांमध्येही मोठा बदल केला आहे.
मानसिक स्वातंत्र्याकडे वाटचाल
जुन्या व्यवस्थेवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीची सरकारे नागरिकांवर विश्वास ठेवत नव्हती. परंतु आता सरकारने छोट्या शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये तंत्रज्ञानाची उपलब्धता करून दिल्याने, गावोगावी एमएसएमई केंद्रांचा उदय झाला आहे, शेतकरी जागतिक बाजारपेठेशी जोडले गेले आहेत. आज भारतीय महिला आंतरराष्ट्रीय कामगिरी करत आहेत. भारतात होणारे हे बदल प्रतिक्रियाशील नसून सातत्यपूर्ण आणि राष्ट्रीय हिताचे आहेत. भारत आता वसाहतवादी विचारांपासून मानसिक स्वातंत्र्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. (Narendra Modi)