मुंबई : ( Mohana Karakhani Book Talk, Mumbai ) सिंगापूरस्थित मराठी साहित्यिका मोहना कारखानीस `टेक ऑफ’ (कथासंग्रह), `चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’ (लेखसंग्रह)) आणि `चंद्रकळा’ (कवितासंग्रह) या पुस्तकांवर आधारित `पुस्तकावर बोलू काही’ हा परिसंवाद कांदिवली, मुंबई येथे १४ डिसेंबर २०२५ या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या परिसंवादात साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर देवेंद्र भुजबळ, गौरी कुलकर्णी, कोमसाप अध्यक्षा नमिता कीर, अशोक मुळे (डिंपल प्रकाशन), लता गुठे (भरारी प्रकाशन) आदी साहित्यिक सहभागी होणार आहेत. यावेळी `टेक ऑफ’ कथेचे अभिवाचन गौरी कुलकर्णी करतील. त्यानंतर `गोवा आणि मराठी साहित्य’ या विषयावर प्रिया कालिका बापट आपले विचार व्यक्त करतील. अखेरच्या सत्रात निमंत्रित कवयित्रींचे काव्यवाचन होतील. यात गौरी कुलकर्णी, हेमांगी नेरकर, प्रतिभा सराफ, संगीता अरबुने, लता गुठे, ज्योती कपिले, फरझाना इकबाल, मेघना साने, कविता मोरवणकर आदी अनेक कवयित्री सहभागी होणार असून कार्यक्रमाचे निवेदन अश्विनी भोईर करतील. मोहना कारखानीस यांची तिन्ही पुस्तके यापूर्वी सिंगापूर येथे साहित्यव्रती आशा बगे यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहेत.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.