Kirit Somaiya : डॉ. किरीट सोमय्या लिखित ‘बांगलादेशी घुसखोर जन्मप्रमाणपत्र घोटाळा’ पुस्तकाचे प्रकाशन

    06-Dec-2025
Total Views |
 Kirit Somaiya 
 
मुंबई : (Kirit Somaiya) भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) लिखित ‘बांगलादेशी घुसखोर जन्म प्रमाणपत्र घोटाळा’ या पुस्तिकेचे प्रकाशन पार पडले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, भाजप नेते राज पुरोहित, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह आदी मान्यवर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
हेही वाचा : Rural Development Department : नागपूर ग्रामीण तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते विकास योजनेत समाविष्ट; ग्रामविकास विभागाचा आदेश जाहीर
 
रवींद्र चव्हाण म्हणाले की, "राष्ट्रविरोधी शक्तींचा घोटाळा उघडकीला आणण्याचे कौतुकास्पद कार्य माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) करत आहेत. राज्यात आजवर सव्वा दोन लाख बांगलादेशी आणि रोहिग्यांनी अवैध मार्गांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले असल्याची धक्कादायक बाब सोमय्या यांनी पुराव्यानिशी प्रशासन आणि पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. डॉ. सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे २५ शहरात ३१ गुन्हे दाखल झाले आणि तब्बल ५ हजार आरोपींना अटक झाली आहे. डॉ. सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रचंड संघर्ष आणि संशोधनातून उघडकीस आणलेला हा घोटाळा आज या पुस्तिकेच्या माध्यमातून सर्वांसमोर आला, याचा आनंद आहे. घुसखोर बांगलादेशी रोहिंगे यांच्या बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत करत असलेल्या या कामातून एक जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे. सर्वांनी या कामी त्यांची साथ द्यायला हवी," असे आवाहन त्यांनी केले.
 
हे वाचलात का?: Raj Thackeray meets Prime Minister Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र! नेमकं काय घडलं?
 
"भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण जी यांच्या हस्ते आज डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) लिखित ‘बांगलादेशी घुसखोर : जन्मप्रमाणपत्र घोटाळा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मुंबईमध्ये रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांची समस्या सर्वज्ञात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मोहीम सुरू आहे. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे."
- मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री