राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या वर्षपूर्तीवर राज्यातील तमाम जनतेने पुन्हा एकदा या आश्वासक चेहर्यावर विश्वासाची मोहोर उमटवली. केवळ आणि केवळ विकासाचे ध्येय ठेवून कार्यरत या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील सरकारची कामगिरी ही विकासकामांचे मार्ग प्रशस्त करणारी आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास या सरकारवर अधिक द्विगुणित झाल्याचे नजीकच्या काळात दिसून येईल. विरोधी पक्ष अक्षरशः या सरकारवर तुटून पडत असताना, नाही-नाही ते आरोप करीत असताना कुठेही विचलित न होता; सरकारची कामगिरी विकासकामांना पुढे नेणारी असल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल म्हणून किंवा उदाहरण म्हणून द्यायचे झाल्यास, पुण्याचा विकास आणि त्या भागात होत असलेल्या वेगवान प्रकल्पांच्या कामांचे देता येईल. मेट्रो, रेल्वे, विमानप्रवास, पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, रिंगरोड आणि अन्य कामांना सध्या जेवढी गती मिळाली आहे, तेवढी राज्यातील अन्य भागांत मुंबईवगळता कुठेही दिसून येत नाही.
अर्थात, याचा अर्थ राज्यात कुठेही विकास होत नाही किंवा हे सरकार अपयशी ठरत आहे, असा होत नाही. त्या-त्या भागातील कामांच्या गरजेनुसार प्रदेशात सर्वत्र विकासकामे आणि नागरी-सुविधांना या सरकारने प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. रोजगारनिर्मितीसाठी नवे उद्योग आणि नव्या तरुणांना थेट नोकरभरतीसाठी नियुक्तिपत्रे देत, महिलांसाठी विविध योजना आणत, वृद्धांसाठी आरोग्यसुविधा देत, या सरकारने समाजातील प्रत्येक घटकांसाठी लक्ष पुरवले आहे. शिवाय, नागरिकांना शासकीय सेवांमध्ये ज्या काही अडचणी येतात, त्या दूर करण्यासाठीदेखील सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या वर्षभराच्या काळात दिसून आल्याने आगामी काळात या सरकारने सुरू केलेल्या विकासकामांचा लाभ सर्व नागरिकांना मिळणार असल्याचा विश्वास महायुती सरकारने दिला, हे येथे अधोरेखित करावेच लागेल. एकूणच, विरोधक सरकारला येनकेन प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न जारी ठेवत असले, तरी तितयाच वेगाने त्यांच्या या विरोधाला न जुमानता हे सरकार विकासकामे अतिशय वेगाने करीत असल्याने नागरिकांचा विरोधकांवर अविश्वास असल्याचे म्हणतात येईल.
मानसिकतेतील अंतर...
‘जेन-झी’ आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहेत. नेपाळमध्ये सरकारविरोधात या ‘जेन-झी’ने उठाव केल्यानंतर आपल्या देशातील काही नतद्रष्ट लोकांनी केवळ या देशातील केंद्र आणि महाराष्ट्रातील सरकारला विरोध करण्यासाठी ‘जेन-झी’ने सरकारविरोधात उठाव करावा, म्हणून ‘री’ ओढायला सुरुवात केली. ‘पप्पू’ म्हणून परिचित असलेल्या एका नेत्याला तर अशी आंदोलने भारतात व्हायला हवीत, अशी स्वप्ने पडायला लागली. मग, अन्य नतद्रष्टांनादेखील तसेच वाटायला लागले. अर्थात, भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशात असे घडेल, अशी सामान्य माणसाची तरी मानसिकत नाही. मात्र, मूठभर लोक समाजमाध्यमांतून आपल्या रिकाम्या डोयातील ‘कुपिक’ कल्पनाविश्वात रमतात आणि देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या मानसिकतेची कीव करावी की, त्यावर संताप व्यक्त करावा, अशी अवस्था कधी-कधी निर्माण होत असते.
मात्र, विवेक जागृत ठेवणारी आपल्या भारतातील जनता अशा लोकांना थारा देत नाही, हे नुकत्याच लागलेल्या बिहार राज्यातील निवडणूक निकालांनी आणि या देशातील सर्वगुणसंपन्न अशा ‘जेन-झी’च्या कामगिरीने दाखवून दिले. अवघ्या १९ वर्षांच्या आतील तरुणांनी आम्ही या देशाचे भविष्य आहोत, हे चांगली स्वप्ने बघणार्यांनादेखील दाखवून दिले आहे. त्यांची कामगिरी ही जगाला हेवा वाटेल इतकी अद्भुत आहे. यात देवव्रत रेखे, डी. गुकेश, वेदांत माधवन यांसारख्या तरुणांनी अवघ्या वयाची विशी गाठायच्या आत केलेली कामगिरी ही ‘पप्पू गँग’च्या प्रक्षोभक आवाहनापेक्षा समाजातील सुखा-समाधानाने राहणार्या लोकांना नक्कीच प्रेरक आहे. किमान जनता यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या घरात वाढणारे मूल हे देशासाठी काहीतरी चांगले करणारे म्हणून उदयास यावे, असा विश्वास या ‘जेन-झी’ने दिला आहे. भारतातील नेतृत्वाचे येथे आलेले अन्य राष्ट्राचे राष्ट्राध्यक्षदेखील तोंडभरून कौतुक करतात, तेव्हा विरोधकांना त्यांनी लगावलेली ही जोरदार थप्पड आहे, हेदेखील जनतेला लक्षात आले आहे. त्यामुळे काहीतरी रिकामी आंदोलने करून लोकांना भडकावणारी विधाने करणार्याच्या या मानसिकतेतील अंतर लोकांच्या लक्षात आले आहे.
- अतुल तांदळीकर