Babri Masjid : प. बंगालमध्ये हुमायूनकडून बाबरी मशिदीची पायाभरणी! ममता सरकारचा वरदहस्त? भाजपचा आरोप
मुस्लीम लांगूलचालनाचा भाजपचा ममता सरकारवर आरोप
06-Dec-2025
Total Views |
कोलकाता : (Babri Masjid) पश्चिम बंगालधील तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबाद येथील बेलडांगा शहरात, शनिवारी बाबरी मशिदीची (Babri Masjid) पाया भरणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बाबरी मशीद (Babri Masjid) पुन्हा उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमधून त्यांचे निलंबनही करण्यात आले होते. (Babri Masjid)
तृणमूलचे माजी आमदार असलेल्या हुमायून कबीर यांनी प. बंगालमधील बेलडांगा शहरात, बाबरी मशिदीची (Babri Masjid) पायाभरणी केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लीम नागरिकांनी विटा घेऊन, बेलडांगा शहरात गर्दी केली होती. सौदी अरेबियामधूनही मुस्लीम धर्मगुरु आले असल्याचे कबीर यांच्यावतीने सांगण्यात आले. उच्च न्यायालयाने मशीद (Babri Masjid) बांधण्यावर स्थगिती देण्यास नकार दिला. ममता बॅनर्जी यांच्या अनेक नेत्यांनी कबीर यांना भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप केला, तर सरकारचे पोलीसच आम्हांला मशीदीच्या पायाभरणीसाठी मदत करत असल्याचे हुमायूनच्यावतीने सांगण्यात आले. (Babri Masjid)
हुमायून यांच्या या कृतीमुळे भाजप आणि तृणमूलच्या नेत्यांमध्ये वाक्युद्ध रंगले असून, हुमायून यांना प. बंगालमध्ये अशांतता पसरवण्यासाठी भाजप पाठिंबा देत असल्याचा आरोप तृणमूलच्यावतीने करण्यात आला, तर ममता बॅनर्जी मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणासाठी बंगालमधील वातावरण अजून बिघडवत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय आयटी सेल प्रमुख अमीत मालवीय यांनी केला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांनी या देशात बाबरच्या नावावरील काहीही मान्य नसल्याची टीका केली आहे. (Babri Masjid)