Children's Drama Competition : यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्यस्पर्धा

११ व १२ डिसेंबर रोजी १९ बालनाट्यांमध्ये रंगणार अटीतटीचा सामना!!

    05-Dec-2025   
Total Views |
Children
 
मुंबई : (Children's Drama Competition) सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवणाऱ्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरमध्ये (Children's Drama Competition) संपन्न होणार आहे. दि. ११ व १२ डिसेंबर रोजी रंगणाऱ्या या महोत्सवात एकापेक्षा एक कल्पनाशक्तीने ओतप्रोत १९ बालनाट्यांची रंगतदार चुरस पहायला मिळणार आहे. यावर्षीची ही स्पर्धा रविकिरण मंडळाचे ज्येष्ठ, निष्ठावान सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लालमातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आली आहे. रविकिरण संस्थेचे अध्यक्ष नागेश नामदेव वांद्रे, चिटणीस विनीत रमेश देसाई, आणि कला विभाग प्रमुख मंदार अनिल साटम यांनी सांगितले की, “या १९ निवडक बालनाट्यांमध्ये मुलांनी दाखवलेली विलक्षण कल्पनाशक्ती आणि रंगभूमीवरील प्रभुत्व पाहून यंदाची स्पर्धा प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.”(Children's Drama Competition)
 
रविकिरणने केवळ मंच उपलब्ध करून दिला नाही, तर बालनाट्याच्या (Children's Drama Competition) गुणवत्तेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगही राबवले. सुप्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी आणि लेखक - अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली २५ वर्षांपूर्वी सुरू केलेली बालकलावंत - शिक्षकांसाठी लेखन कार्यशाळा ही त्यातील सर्वांत महत्त्वाची देणगी. लेखन, कल्पनाशक्ती आणि नाट्यनिर्मितीची बीजे पेरणाऱ्या या कार्यशाळेने अनेक सक्षम लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार घडवण्याचे कार्य आजही अविरत सुरू ठेवले आहे.(Children's Drama Competition)
 
हेही वाचा : Indigo Delay चा लोकप्रिय मराठमोळा गायक राहूल वैद्यला ४.२० लाखांचा फटका
 
‘रविकिरण’ची ३९ वी स्मृती बालनाट्य स्पर्धा (Children's Drama Competition) ही केवळ स्पर्धा नसून — बालकलावंतांच्या 
(Children's Drama Competition) स्वप्नांचा, कल्पनाशक्तीचा आणि कलात्मकतेचा भव्य उत्सव आहे. उद्याच्या रंगभूमीचे तारे घडवणारा हा महापर्व दरवर्षीप्रमाणे यंदाही नवे तेज, नवी उमेद आणि नव्या आशांनी उजळणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेतला मुकुटमणी ठरेल असा हा कलात्सव पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुढील काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
(Children's Drama Competition)
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.