मुंबई : (PM Modi gifts Russian edition of Bhagavad Gita to Putin) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे सध्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत पुतिन यांची भेट घेतल्यानंतर रशियन भाषेतील श्रीमद् भगवद्गीतेची एक प्रत त्यांना भेट म्हणून दिली. पंतप्रधानांनी एक्सवर यासंदर्भात फोटो शेअर केल्यावर ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. पण १५ वर्षांपूर्वी रशियातच भगवद्गीतेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती.
नेमकं काय घडलं होतं?
२०११ साली रशियात भगवद्गीतेवर बंदी आणण्याची मागणीने जोर धरला होता. या मागणीवर सैबेरियन सिटी ऑफ टॉम्स्कमधील न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. भगवद्गीता हे एक कट्टरतावादी पुस्तक असल्याचा दावा रशियात त्यावेळी करण्यात आला होता. काही रशियन याचिकाकर्त्यांनी तर भगवद्गीतेची तुलना थेट हिटलरच्या माईन काम्फसोबत सुद्धा केली होती. याच मागणीच्या आधारावर हे सगळे आरोप भगवद्गीतेवर ए. सी. भक्तिवेदांता स्वामी प्रभुपदा यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून सुरू झाला होता. या पुस्तकात इतर धर्मीयांबाबत अविश्वास दर्शवण्यात आल्याचाही दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.
न्यायालयाने याचिका फेटाळल्या
दरम्यान, रशियन न्यायालयात भगवद्गीतेविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर रशियातील भारतीयांनी व भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोर्चेदेखील निघाले. तत्कालीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव हे भारत दौऱ्यावर निघण्याच्या दोन दिवस आधी या प्रकरणी रशियन कोटनि निकाल दिला. रशियातील न्यायालयाने मात्र भगवद्गीतेला अवैध ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. स्थानिक ISCKON समितीने या याचिकेच्या विरोधात युक्तिवाद केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर इस्कॉन समितीची बाजू मांडणारे वकील अलेक्झांडर रॉकोव्ह यांनी निकाल न्याय्य असल्याचं सांगत समाधान व्यक्त केलं होतं. "न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे रशिया एक लोकशाहीवादी देश होऊ लागल्याचंच दिसून येत आहे", असंही त्यांनी नमूद केलं होते.
त्यामुळेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या पंतप्रधानांना भगवद्गीता भेट देणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी म्हणजे भारतीय संस्कृती जी सर्वश्रेष्ठ असूनही जगाने तिला कायमच उपेक्षित केले होते. खरंतर पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी अभिमानाने हे तत्वज्ञान जगाला द्यायला हवे होते, पण तसे झाले नाही. आज रशिया युक्रेनचं युद्ध चालू असताना मोदींनी हि भगवद्गीता भेट देऊन नकळत संदेश दिलाय की भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान हे फक्त भौतिक प्रगती नाही तर आध्यात्मिक प्रगती सुद्धा करण्याची प्रेरणा देते.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\