Allahabad High Court : धर्मांतरितांना आरक्षण नको; खऱ्या वंचितांसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ठाम दिलासा

    04-Dec-2025
Total Views |
Allahabad High Court
 
मुंबई : (Allahabad High Court) हिंदू धर्म सोडून इतर कोणताही धर्म स्वीकारल्यास अनुसूचित जाती-जमाती आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असा महत्वाचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) दिला आहे. धर्मांतर करूनही आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करणे ही संविधानाची फसवणूक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच धर्मांतर केल्यानंतरही एससी, एसटीच्या लाभांचा गैरवापर होत आहे का, याबाबतची चौकशी चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.(Allahabad High Court)
 
न्यायमूर्ती प्रवीणकुमार गिरी यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन किंवा इतर कोणताही धर्म स्वीकारल्यास आरक्षणाचा हक्क आपोआप संपतो, असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले. शीख, बौद्ध, जैन आणि आर्य समाजी हे हिंदू परंपरेत येतात, तर मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी आणि ज्यू धर्मीयांना हिंदू मानता येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.(Allahabad High Court)
 
हेही वाचा : ‘तो’ हिंदू नव्हे काय?
 
उत्तर प्रदेशातील जिल्हाधिकाऱ्यांना धर्मांतरित व्यक्तींकडून एससी, एसटी लाभ घेतले जात आहेत का, याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराजगंज जिल्ह्यात एका व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही स्वतःला हिंदू म्हणून दाखविल्याच्या प्रकरणाची तीन महिन्यांत चौकशी करण्याचे विशेष आदेशही न्यायालयाने दिले.(Allahabad High Court)
 
जितेंद्र साहनी यांच्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला. धर्मांतराशी संबंधित गुन्हेगारी प्रक्रियेतून स्वतःची सुटका मिळवण्यासाठी त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने (Allahabad High Court) फेटाळली. गरज वाटल्यास याचिकाकर्त्याने अधिनस्थ न्यायालयात अर्ज दाखल करावा, असेही स्पष्ट करण्यात आले.(Allahabad High Court)
 
सर्वोच्च न्यायालयातील संबंधित खटल्यांचा दाखला देत धर्मांतर करून लाभ मिळवण्याचा कोणताही प्रयत्न संविधानविरोधी असल्याचे उच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला.(Allahabad High Court)