CM Devendra Fadnavis : नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवर्षप्रारंभाच्या पुर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा
31-Dec-2025
Total Views |
मुंबई : (CM Devendra Fadnavis) नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(CM Devendra Fadnavis)
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला दिलेल्या या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेत, पुढे जाऊया. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर, नेतृत्व करणारे राज्य आहे. (CM Devendra Fadnavis) महाराष्ट्राची प्रगतीची पताका अशीच फडकत राहो, यासाठी आपण एकजूट करूया. महाराष्ट्राच्या मातीत आव्हाने स्वीकारण्याची धमक आहे. आव्हाने आलीच, तर त्यावर मात करण्याचा निर्धार करुया. नवे वर्ष नवचैतन्य घेऊन येणारे, आशा, आकांक्षांना बळ देणारे ठरेल अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नववर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी, सर्वच क्षेत्रात भरभराट, समृद्धी घेऊन येणारे ठरावे, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.(CM Devendra Fadnavis)