BMC Election : महापालिका निवडणुकीत भाजपाचे कमळ बिनविरोध
31-Dec-2025
Total Views |
मुंबई : (BMC Election) नगरपालिकेप्रमाणेच राज्यातील महापालिका निवडणुकीत (BMC Election) देखील भाजपाने जोरदार आघाडी घेतली आहे. निवडणुकीपूर्वीच (BMC Election) भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून यापैकी कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे या तीन महापालिकांमध्ये भाजपचे ‘कमळ’ आधीच फुलले आहे.(BMC Election)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (BMC Election) प्रभाग क्रमांक १८ मधून रेखा चौधरी, अन प्रभाग क्रमांक २६ क मधून आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच रंजना पेनकर यांनीदेखील बिनविरोध विजय मिळवला आहे. तर मुंबई महानगरपालिकेतून भाजपच्या जिग्ना शहा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. धुळे महानगरपालिकेत (BMC Election) उज्वला भोसले तर पनवेल महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक १८ मधून नितीन पाटील यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.(BMC Election)