मुंबई : (Amravati Ambadevi Temple) अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थानास (Amravati Ambadevi Temple) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.(Amravati Ambadevi Temple)
१९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान, चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाने (Amravati Ambadevi Temple) या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती.(Amravati Ambadevi Temple)
त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे तीन एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेऊन ती श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला (Amravati Ambadevi Temple) भोगवटादार वर्ग २ म्हणून मिळणार असून जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे.(Amravati Ambadevi Temple)
"या निर्णयामुळे मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण होतील. तसेच, चिखलदऱ्याच्या पर्यटन वैभवात भर पडेल. अंबादेवी संस्थानच्या (Amravati Ambadevi Temple) माध्यमातून या पवित्र भूमीचा कायापालट होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे."(Amravati Ambadevi Temple)
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....