Sadanand Date : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती; ३ जानेवारी रोजी पदभार स्विकारणार

    31-Dec-2025   
Total Views |
Sadanand Date
 
मुंबई : (Sadanand Date) राज्याच्या पोलिस महासंचालकपदी जेष्ठ पोलिस अधिकारी सदानंद दाते (Sadanand Date) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाच्या वतीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.(Sadanand Date)
 
येत्या ३ जानेवारी रोजी विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या निवृत्त होतील. त्यानंतर सदानंद दाते (Sadanand Date)  पदभार स्विकारणार असून त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा असेल. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माइल यांच्याशी दोन हात करणारे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.(Sadanand Date)  
 
हेही वाचा : BMC Election : महापालिका निवडणुकीत भाजपाचे कमळ बिनविरोध 
 
सदानंद दाते यांची कारकीर्द
 
सदानंद दाते (Sadanand Date) यांनी महाराष्ट्र एटीएस प्रमुख, मुंबई सहपोलीस आयुक्त (गुन्हे), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), कायदा व न्याय विभागाचे संयुक्त सचिव अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या 'फोर्स वन' या कमांडो पथकाचेही नेतृत्व केले.(Sadanand Date) यासोबतच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांशी मुंबईतील कामा रुग्णालयात त्यांनी थेट संघर्ष केला. याबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. (Sadanand Date) त्यानंतर ते भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) नेतृत्व करण्यासाठी नवी दिल्लीला गेले. राज्य सरकारच्या विनंतीवरून त्यांना दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले.(Sadanand Date)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....