Ulhasnagar Municipal Corporation : निवडणूक विशेष - महानगरपालिकेचा रणसंग्राम

उल्हासनगर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा महापौर असेल

    31-Dec-2025
Total Views |
Ulhasnagar Municipal Corporation
 
ठाणे : (Ulhasnagar Municipal Corporation) ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक २०२५-२०२६ च्या (Ulhasnagar Municipal Corporation) काळात होत असून भाजप स्वबळावर या उल्हासनगर महानगरपालिकेत लढणार आहे तर शिवसेना (शिंदे गट), टीम ओमी कलानी आणि साई पार्टी यांच्यात आघाडी करून लढण्याची तयारी आहे. एकूण ७८ जागांसाठी ही निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असून, १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी निकाल लागणार आहे, यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात मोठा रणसंग्राम सुरू झाला आहे. या निवडणुकीकरिता (Ulhasnagar Municipal Corporation) उमेदवारांचे ६९५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहे. तर २ जानेवारीला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.(Ulhasnagar Municipal Corporation)
 
उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Municipal Corporation) ही ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगर शहराची मुख्य नागरी स्वराज्य संस्था आहे. ही महानगरपालिका (Ulhasnagar Municipal Corporation) शहराच्या नागरी सेवा, योजना आणि शहर विकास यासाठी जबाबदार आहे. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या ७८ इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या 20 असून तीन सदस्यीय प्रभाग २ व चार सदस्यीय १८ प्रभाग आहेत. ७८ जागापैकी १३ जागा अनुसूचित जाती, १ जागा अनुसूचित जमाती, २१ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ४२ जागा सर्वसाधारण असून त्यापैकी २० जागा महिलांसाठी आरक्षित आहे. या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी ७ जागा अनुसूचित जाती (महिला), १  जागा अनुसूचित जमाती (महिला), ११ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि २० सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आरक्षण आहे. उल्हासनगरचे भाजपचे आमदार भाजपचे कुमार आयलानी यांची ताकत आहे. यामध्ये आताच निवडणूका झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अंबरनाथ आणि बदलापूर येथे नगराध्यक्ष पदावर भाजपने वर्चस्व ठेवले आहे. यामध्ये उल्हासनगर येथे देखील भाजप स्वबळाबर लढणार असून निवडणुकीत मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. भाजप मोठा पक्ष असल्याने या महापालिकेत स्वबळावर भाजप लढणार आहे, भाजपने सर्व जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे इतर पक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे. शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पार्टी यांनी एकत्र येऊन निवडणूक (Ulhasnagar Municipal Corporation) लढवत आहे. यामध्ये भाजपने - ७८ जागा, शिवसेनेने ३५ जागा, टीम ओमी कलानीने- ३२ जागा, साई पार्टी- ११ जागा वर उमेदवार उभे केले आहेत. तर उबाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयने देखील आपले उमेदवार उभे केले आहेत.(Ulhasnagar Municipal Corporation)
 
हेही वाचा : Municipal Corporation : मुंबईचे रस्ते आणि प्रवाशांचे खस्ते, महापालिकेचे धोरण शून्य  
 
सध्याचे राजकारण :
 
उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक (Ulhasnagar Municipal Corporation) जाहीर होऊन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र देखील दाखल झाले आहे, आता माघार कुणी घेते का ते पाहावे लागणार आहे. भाजपने स्वबळावर या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीत (Ulhasnagar Municipal Corporation) काही दिवसांपूर्वीच ओमी कलानी टीमने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. यामुळे या उल्हासनगर महानगरपालिकेत महापौर कुणाचा असेल आणि जनता कुणाला विजयाची पताका बानते हे पाहणे आवश्यक ठरणार आहे, 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष एकमेकांविरुद्ध भिडले होते. त्यावेळी कलानी गट भाजपमध्ये गेल्यामुळे पहिले अडीच वर्ष महापालिकेत (Ulhasnagar Municipal Corporation) भाजपचा महापौर होता. मात्र त्यानंतर कलानी गट भाजपला सोडून शिवसेनेबरोबर गेल्याने अडीच वर्ष शिवसेनेची महापालिकेत सत्ता होती. (Ulhasnagar Municipal Corporation)