क्रीडावेध २०२५

    31-Dec-2025
Total Views |

2025 हे वर्ष क्रीडाविश्वासाठी केवळ जय-पराजयांचे नव्हे, तर इतिहास घडवणाऱ्या क्षणांचे ठरले. मैदानावर नवे विक्रम कोरले गेले, तर काही दिग्गजांनी आपल्या कारकिदला सन्मानपूर्वक पूर्णविराम दिला. क्रिकेटच्या चौकार-षटकारांपासून ते ऑलिम्पिक खेळांतील घामाच्या थेंबांपर्यंत, प्रत्येक खेळाने प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श केला. विजयाच्या जल्लोषाबरोबरच पराभवानंतरची जिद्द, संघर्ष आणि पुनरागमनाच्या कहाण्यांनीही 2025 लक्षात राहिले. अशा या मावळत्या वर्षाच्या उंबरठ्यावर क्रीडा क्षेत्रातील काही ठळक घडामोडींचा घेतलेला हा मागोवा...


‘फिडे सर्किट 2025‌’चा विजेता भारताचा ग्रॅण्डमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद!


नोव्हेंबरमध्ये ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ‘वर्ल्ड बॉक्सिंग कप‌’च्या अंतिम सामन्यात भारताची अव्वल कामगिरी!


धन्यवाद भारत...

भारताचा प्रसिद्ध टेनिस खेळाडू रोहन बोपण्णाची वयाच्या 45व्या वष निवृत्ती जाहीर


नॉर्वे येथे आयोजित केलेल्या ‌‘आयडब्ल्यूएफ वेटलिफ्टिंग स्पर्धे‌’त, भारताच्या मीराबाई चानू यांनी महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. 48 किलो वजनी गटामध्ये मीराबाई चानू यांनी एकूण 199 किलो वजन उचलून, सुवर्णपदकाची कमाई केली.

रो-को पर्वाची सांगता...

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या वष त्यांनी टी-20 विश्वचषक विजेतेपदानंतर टी-20तून निवृत्ती स्वीकारली होती.

दिव्य कामगिरी

19 वर्षीय दिव्या देशमुख हिने आपल्या अचाट कामगिरीने महिला विश्वचषक जिंकला. त्यामुळे ‌‘ग्रॅण्डमास्टर‌’ किताब जिंकणारी भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली.

नीरज चोप्रा

भारताची पहिलीच जागतिक ॲथलेटिक्स सुवर्ण भालाफेक स्पर्धा यशस्वी ठरली, ज्यामध्ये जगभरातील 12 भालाफेकपटूंनी भाग घेतला. दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने 86.18 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह सुवर्णपदक जिंकले.

नवी सुरुवात

शुभमन गिल याची भारतीय कसोटी क्रकेट संघाचा 37वा कर्णधार म्हणून नियुक्ती

भारताने आणि दक्षिण आशियाने प्रथमच ‌‘पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप‌’चे आयोजन केले होते. यामध्ये भारताने 22 पदकांची कमाई करून, आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली 22 पदकांची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारताचे स्थान सहाव्या क्रमांकावर राहिले.

वैभव सूर्यवंशीचे 2025 मध्ये आयपीएलमध्ये वादळी पदार्पण

आशियाचे ‌‘धुरंधर‌’

भारतीय संघाने आशियाई क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले.

भारतीय महिला कबड्डी संघ विश्वविजेता झाला. ढाक्याला झालेल्या सामन्यात चीन-ताईपेई संघाचा 35-28 गुणांनी पराभव करत महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत महिलांनी सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.

‘आयसीसी‌’ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी घडवला इतिहास! महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत देदिप्यान विजय. नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रीडागारात दि. 2 नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत, त्यांचा पहिला ‌’आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक‌’ जिंकला.

न्यूझीलंडचा पराभव करून, भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. दि. 9 मार्च रोजी ‌‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी‌’च्या अंतिम सामन्यात, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर 252 धावांचे आव्हान ठेवले होते.

‘आरसीबी‌’ संघाचा विजेतेपदाचा वनवास संपला... 18 वर्षांनी आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी

2025 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या खो-खो विश्वचषकावर भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नाव! या स्पर्धेत भारतासह नेपाळ, भूतान, पेरू, ब्राझील असे एकूण 20 देश सहभागी झाले होते.

नोव्हेंबरमध्ये महिला क्रिकेटपटूंनी दृष्टिबाधितांच्या पहिल्या ट्वेंटी-20 विश्वचषकावरही कोरले भारतीयांचेच नाव! श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा पराभव केला. यामध्ये नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि यजमान भारत असे सहा संघ सहभागी होते.

स्क्वॅश विश्वचषक स्पर्धा

भारताच्या मिश्र स्क्वॅश संघाने चेन्नईतील एक्सप्रेस अव्हेन्यू मॉलमध्ये स्क्वॅश विश्वचषक जिंकून इतिहास रचला. या संघात जोश्ना चिनप्पा, अनाहत सिंग, अभय सिंग आणि वेलावन सेंथिलकुमार यांचा
समावेश होता.