मुंबई : (Vivek Bhimanwar New MPSC Chairman) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे. भीमनवार अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. अभय एकनाथ वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. (Vivek Bhimanwar New MPSC Chairman)
सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, विवेक भीमनवार यांची अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून पुढील सहा वर्षे किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. विवेक भीमनवार यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा आयोगाच्या कार्यपद्धती अधिक प्रभावी, तंत्रस्नेही आणि उमेदवारकेंद्री करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नियुक्तीमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेला नवी दिशा आणि अधिक विश्वासार्हता मिळण्याची शक्यता आहे. (Vivek Bhimanwar New MPSC Chairman)
माजी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांचे कार्यकाळ संपला असल्याने एमपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता आता विवेक भीमनवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सध्या परिवहन आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या भीमनवार यांनी या या पूर्वी फिल्मसिटीचे संचालक, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. (Vivek Bhimanwar New MPSC Chairman)