
मुंबई : २०२५ हे वर्ष संपायला अगदी शेवटचे काही तास उरले आहेत. पण या वर्षभरात अनेक नामवंत कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. या सरत्या वर्षाला निरोप देताना या कलाकाराचं स्मरण नक्कीच व्हायला हवं.
मनोज कुमार : भारतीय चित्रपटांचे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक, ‘भारत कुमार’ म्हणून ओळख असलेले मनोज यांचे, ४ एप्रिल २०२५ रोजी ८७ व्या वर्षी निधन झाले.
गोवर्धन असरानी : लोकप्रिय विनोदी अभिनेते गोवर्धन असरानी यांचे, २० ऑक्टोबर २०२५ रोजी ८४ व्या वर्षी निधन झाले.
धर्मेंद्र : ‘बॉलीवूडचा ही-मॅन’ म्हणून प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र देओल यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले. ‘शोले’, 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'सीता और गीता' यांसारख्या अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्री शोकाकुल झाली.
शेफाली जरीवाला : ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे २७ जून २०२५ रोजी अचानक निधन झाले. ४१ व्या वर्षी झालेल्या तिच्या निधनाने संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली होती.
अच्युत पोतदार : एके काळचे प्रसिद्ध मराठी-हिंदी चित्रपट अभिनेते, १८ ऑगस्ट २०२५ रोजी ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
संध्या शांताराम : ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पत्नी, संध्या शांताराम (विजया देशमुख) यांचे ४ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले, ज्यामुळे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. 'पिंजरा', 'नवरंग' सारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केले होते.
कामिनी कौशल : हिंदी चित्रपटांची मोठी कारकीर्द असलेल्या अभिनेत्री, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ९८ व्या वर्षी निधन झाले.
ज्योती चांदेकर : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तसेच अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतची आई ज्योती चांदेकर यांचे, १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले.
बाळ कर्वे : ज्येष्ठ मराठी अभिनेते, २८ ऑगस्ट २०२५ रोजी ९५ व्या वर्षी निधन झाले.
झुबीन गर्ग : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-संगीतकार-अभिनेता, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये अपघाती निधन.
पंकज धीर : अभिनेते, ‘महाभारत’ मधील कर्ण भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले पंकज धीर यांचे, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले.
विवेक लागू : ज्येष्ठ मराठी अभिनेते विवेक लागू यांचे १९ जून २०२५ रोजी निधन झाले.
दया डोंगरे : दीर्घ काळ मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री दया डोंगरे यांचे ३ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
प्रिया मराठे : लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कॅन्सरशी झुंज देताना निधन झाले. वयाच्या अवघ्या ३८ व्या तिने जगाचा निरोप घेतला.
डॉ. विलास उजवणे : ‘वादळवाट’ आणि इतर सिरीअल्समध्ये काम करणाऱ्या डॉ. विलास उजवणे यांचे ४ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले.