मुंबई : (Dhruv NG) बेंगळुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून पूर्णतः स्वदेशी रचना व निर्मिती असलेल्या नागरी हेलिकॉप्टर 'ध्रुव एनजी'ने (Dhruv NG) आपले पहिले उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण केले. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी याप्रसंगी हिरवा झेंडा दाखवला. हा भारताच्या विमानन इतिहासातील एक गौरवाचा क्षण मानला जात आहे. उड्डाणापूर्वी मंत्री नायडू स्वतः पायलटसोबत कॉकपिटमध्ये बसले आणि हेलिकॉप्टरमधील प्रगत तंत्रज्ञान व वैशिष्ट्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.(Dhruv NG)
अधिकाऱ्यांच्या मते, ध्रुव-एनजी (Dhruv NG) हे ५.५ टन वजनाचे, ट्विन-इंजिन हलके बहुउद्देशीय हेलिकॉप्टर असून ते भारतातील पर्वतीय, वाळवंटी आणि उष्ण प्रदेशांसारख्या विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये कार्यक्षमतेने काम करण्यासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आले आहे. मंत्री राम मोहन नायडू यावेळी म्हणाले की, ध्रुव-एनजी (Dhruv NG) हे केवळ एक हेलिकॉप्टर नसून भारताची वाढती तांत्रिक क्षमता, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेचे जिवंत प्रतीक आहे. त्यांनी या यशासाठी 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड'चे अभियंते, डिझायनर्स, तंत्रज्ञ आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.(Dhruv NG)
ध्रुव-एनजी (Dhruv NG) मध्ये दोन शक्ती १ एच १ सी इंजिन आहेत जे अधिक शक्ती आणि उत्कृष्ट कामगिरी दर्शवतात. यात जागतिक दर्जाचे ग्लास कॉकपिट, क्रॅशप्रूफ सीट्स, सेल्फ-सीलिंग फ्युएल टँक आणि प्रगत कंपन नियंत्रण प्रणाली आहे, ज्यामुळे उड्डाण अधिक सुरक्षित व आरामदायी होते. हे हेलिकॉप्टर व्हीआयपी वाहतूक, एअर अँब्युलन्स, पर्यटन, ऑफशोअर ऑपरेशन्स, आपत्ती निवारण आणि कायदा-सुव्यवस्था अशा अनेक कामांसाठी उपयुक्त आहे.(Dhruv NG)
मुख्य वैशिष्ट्ये :
कमाल टेक-ऑफ वजन: ५,५०० किलोग्रॅम
कमाल वेग: २८५ किमी/तास
उड्डाण वेळ: सुमारे ३ तास ४० मिनिटे
कमाल उंची : ६ हजार मीटर
प्रवासी क्षमता : ४-६ व्हीआयपी सीट्सपासून १४ पर्यंत, एअर अँब्युलन्स मोडमध्ये ४ स्ट्रेचर
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक