नवी दिल्ली : (Department Of Telecommunications) दूरसंचार विभागाने (DoT) (Department Of Telecommunications) राष्ट्रीय वारंवारता वाटप आराखडा २०२५ (NFAP-2025) जाहीर केला असून तो मंगळवार, दि.३० डिसेंबर २०२५ पासून अंमलात येणार आहे. हा आराखडा भारतातील रेडिओ-फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे भारताचा दूरसंचार क्षेत्रातील प्रवास जागतिक मानकांशी अधिक सुसंगत होणार आहे. NFAP-2025 अंतर्गत ८.३ kHz ते ३००० GHz या विस्तृत वारंवारता श्रेणीतील स्पेक्ट्रम विविध रेडिओ-दूरसंचार सेवांसाठी निश्चित करण्यात आले आहे.(Department Of Telecommunications)
या नव्या आराखड्यात 5G, 5G Advanced तसेच भविष्यातील 6G नेटवर्कसाठी आवश्यक असलेल्या स्पेक्ट्रम गरजांवर विशेष भर देण्यात आला आहे. 6425 ते 7125 MHz हा मिड-बँड आंतरराष्ट्रीय मोबाईल टेलिकम्युनिकेशन्ससाठी (Department Of Telecommunications) ओळखण्यात आल्याने देशातील मोबाईल नेटवर्क क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. यासोबतच Ka, Q आणि V बँड्सचे वाटप उपग्रह आधारित सेवांसाठी करण्यात आले असून, यामुळे भूस्थिर तसेच LEO आणि MEO उपग्रह समूहांद्वारे उच्च-गती ब्रॉडबँड सेवा शक्य होणार आहेत.(Department Of Telecommunications)
NFAP-2025 मध्ये इन-फ्लाइट आणि मेरीटाईम कनेक्टिव्हिटीसाठी अतिरिक्त स्पेक्ट्रम तरतुदी करण्यात आल्या असून, प्रवासी विमानांमध्ये आणि समुद्रातील जहाजांवर अखंड इंटरनेट सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच वाहन-ते-सर्व (V2X) कम्युनिकेशनसारख्या (Department Of Telecommunications) नव्या तंत्रज्ञानालाही पाठबळ देण्यात आले आहे. या सर्व बदलांमुळे भारतातील डिजिटल परिसंस्थेचा विकास वेगाने होऊन दूरसंचार क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.(Department Of Telecommunications)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.