मुंबई : ( Mumbai Ward 119 ) मुंबई वॉर्ड क्र ११९ हा खुल्या प्रवर्ग म्हणून जाहिर झाला. २०२२ साली हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला होता. मात्र नवीन समिकरणानुसार हा वॉर्ड खुला प्रवर्ग म्हणून घोषित झाला. त्यामुळे या वॉर्डात प्रत्येक पक्षातील पुरूष कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांच्या आशा पालवल्या. पक्ष आपल्या निष्ठेची आणि गुणांची किंवा आणखिन कोणत्या कौशल्याची कदर करत आपल्यालाच तिकीट देणार असे त्यांना वाटत होते.
पण युती आणि आघाडीचे संदर्भ बदलले. भाजप आणि शिवसेना शिंदे गट, रामदास आठवलेंची आरपीआय यांची युती अबाधित राहिली तर राष्ट्रवादी अजित पवार गट वेगळा झाला. त्याचवेळी शिंदे गटासोबत आंनदराज आंबेडकरांची रिपब्लीकन सेना जुडली गेली. तर आघाडीमध्येही काँग्रेस आणि वचित आघाडी एकत्र आले तर उबाठा गट आणि मनसे यांनी युती केली. तर शरद पवार राष्ट्रवादी गट स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. यामुळे ११९ वॉर्डच्या निवडणूकीचे स्वरूप पालटले.
या वॉर्डात २०१७ साली भाजपअंतर्गत धुसफुसीमुळे राष्ट्रवादी पक्षाच्या मनिषा रहाटे जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीमध्यें दोन गट झाल्यानंतर त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत होत्या. त्यामुळे निवडणूक जाहिर झाल्यावर महायुतीसोबत असलेल्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वाटत होते की युतीच्या वाटाघाटीत ११९ सीट अजित पवार गटाला मिळेल. पण अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढत असल्याने युतीतून हा वॉर्ड शिंदे शिवसेना गटाला मिळाला. तर उबाठा आणि मनसे आघाडीत हा वॉर्ड मनसेला दिला गेला दुसरीकडे काँग्रेसने हाा वॉर्ड वंचित आघाडीला दिला. तर आधीच्या शरद पवार गटात असलेल्या मनिषा या दोन दिवसापुर्वीच अजित पवार गटात गेल्या. या सगळ्यामुळे कोण कोणत्या गटात गेले याबाबत वॉर्डात सभ्रंम आहे.
या वॉर्डमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना युतीकडून शिंदे गट शिवसेनेचे राजेश सोनने लढणार आहेत तर उबाठा आणि मनसे आघाडीकडून मनसेचे विश्वजित ढोलम हे उमेदवार आहेत. विशेष असे की विधानसभेच्या निवडणूकीमध्ये उबाठा गटाचे उमेदवार आणि विद्यमान आ. सुनिल राऊत यांच्या विरोधात विश्वजित यांनी निवडणूक लढवली होती. तर काँग्रेस आणि वंचित कडून वंचित चे चेतन अहिरे निवडणूक लढवत आहे. वॉर्डच्या माजी नगरसेविका मनिषा या शरद पवार गटातून बाहेर पडत अजित पवार गटातून निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पार्टीतर्फे या वार्डातून डॉ सुरेश भालेराव निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर या वॉर्डमध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणिय आहे.
त्यामुळे मुस्लिम नेते अब्दुल अंसारी,अन्वर शेख, आसिप सिद्दीकी, वारीस पठान इत्यादीही या वॉर्डातून इच्छुक आहे. गेल्या वर्षी हा वॉर्ड भाजपने लढला होता. मात्र अंतर्गत धुसपुसीमुळे हा वॉर्ड भाजपच्या हातून निसटला होता. या वर्षी कार्यकर्त्यांनी एकत्र येत वॉर्ड लढवण्याचा निश्चय केला होता. मात्र हा वॉर्ड शिंदे गट शिवसेनेला गेला. या वॉर्डमध्ये खरी लढत शिंदे गट शिवसेना आणि मनसे यांच्यामध्येच आहे. तरीही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीही या वॉर्डमध्ये कशी लढत देणार हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे आहे.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.