नवी मुंबई : (Hetwane Water Development Project) नवी मुंबईच्या पाणीसुरक्षेच्या दिशेने सिडकोने टाकलेले पाऊल आज ऐतिहासिक ठरले. हेटवणे जलावर्धन प्रकल्पांतर्गत (Hetwane Water Development Project) वहाळ गावातील शाफ्ट-४ येथे पहिल्या बोगद्याचा यशस्वी ‘ब्रेकथ्रू’ पूर्ण झाला. हा टप्पा सिडकोच्या इतिहासातील पहिलाच टनल ब्रेकथ्रू असून, प्रकल्पातील (Hetwane Water Development Project) पॅकेज-१ चे काम करणाऱ्या ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने हे महत्त्वाचे यश साध्य केले आहे. या पॅकेजमध्ये ८.७ किमी लांबीच्या प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या बोगद्याचे काम समाविष्ट असून त्यापैकी ५.५२ किमी काम पूर्ण झाले आहे.(Hetwane Water Development Project)
सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा क्षण सिडकोसाठी ऐतिहासिक असल्याचे सांगत, काही दिवसांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिल्या उड्डाणानंतर आज आणखी एक मैलाचा दगड गाठल्याचे नमूद केले. ॲफकॉन्सचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी भूगर्भीय व लॉजिस्टिक अडचणींवर मात करत सुरक्षितता व गुणवत्ता जपत हा प्रकल्प सहा महिने आधी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. नवी मुंबईतील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन उभारण्यात येणाऱ्या या योजनेमुळे (Hetwane Water Development Project) सिडकोची पाणीपुरवठा क्षमता १२० एमएलडीवरून २७० एमएलडीपर्यंत वाढणार असून, याचा थेट फायदा लाखो नागरिकांना होणार आहे.(Hetwane Water Development Project)
“कामाचा वेग, गुणवत्ता आणि वेळेआधी ब्रेकथ्रू पूर्ण केल्याबद्दल ॲफकॉन्स अभिनंदनास पात्र आहे. इतर कंत्राटदारांनी मुदतवाढ मागू नये आणि आपली कामे वेळेत किंवा वेळेआधी पूर्ण करावीत. संपूर्ण योजना वेळेत पूर्ण झाली, तर नवी मुंबईच्या जनतेला त्याचा मोठा लाभ होईल.”(Hetwane Water Development Project)
- विजय सिंघल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको
ॲफकॉन्सचा आत्मविश्वास : प्रकल्प सहा महिने आधी पूर्ण
“भूगर्भीय अडचणी, लॉजिस्टिक आव्हाने असूनही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करत आम्ही बोगदा कामात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत. सुरक्षितता आणि दर्जा कायम ठेवत हा संपूर्ण प्रकल्प आम्ही सहा महिने आधी पूर्ण करू.”(Hetwane Water Development Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.