Sheetal Tejwani : शीतल तेजवानी यांना अटक

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण

    03-Dec-2025
Total Views |

Sheetal Tejwani
पुणे : (Sheetal Tejwani) कोरेगाव - मुंढव्यातील ४० एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani)  पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांना विशेष वागणूक दिल्याने पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी जमीन खरेदी प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीचे नाव समोर आले होते. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून त्यांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर बुधवारी अटकेची कारवाई करण्यात आली.(Sheetal Tejwani)
 
विशेष म्हणजे ह्या जमीन घोटाळा प्रकरणातील दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने (Sheetal Tejwani) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी देखील झाली. माझ्यावर दाखल झालेला एफआयआर मीडिया रिपोर्टनुसार गुन्हा दाखल केला असून मीडियात फरार घोषित करण्यात आल्याचा आरोप तेजावणी यांनी याचिकेत केला होता. दरम्यान अन्य एका जमिनी खरेदी प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद देखील वकिलांनी केला होता. कोरेगाव पार्क - मुंढवा जमीन गैरव्यवहाराबद्दल आधी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यात दिग्वीजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु या़ंच्या विरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता‌. या प्रकरणी तपासाला गती देण्यासाठी दि. ३ डिसेंबर बुधवारी अखेर शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे.(Sheetal Tejwani)
 
हेही वाचा : Orange Gate-Marine Drive Project : भूमिगत मेट्रोच्याही खालून जाणारा भूमिगत रस्ता, शहराच्या मध्यवर्ती ५० मीटर खोल खोदकामाला सुरुवात  
 
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात आवाज उठवला होता. त्यांनी पुणे पोलिसांसह , चौकशी समितीकडे सर्व पुरावे सादर केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती. आता या प्रकरणाच्या तपासातून नेमके काय बाहेर येते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.(Sheetal Tejwani)
१८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी -
 
कोरेगाव पार्क - मुंढवा येथील १८०० कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ ३०० कोटींमध्ये घेतली. यासाठी स्टँप ड्युटी म्हणून ५०० रूपये मोजल्याचा आरोप करण्यात आला होता. अमेडीया कंपनीने कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही केली होती. व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने ४८ तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ २७ दिवसांत हा व्यवहार झाला होता. हे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी दिली होती.(Sheetal Tejwani)