Revanth Reddy : रेवंथ रेड्डींचा काँग्रेसी हिंदूद्वेष्टेपणा पुन्हा उघड!

देवी-देवतांचा अपमान करत ओकळी गरळ; भाजप आक्रमक

    03-Dec-2025
Total Views |
Revanth Reddy
 
मुंबई : (Revanth Reddy) "ज्याप्रमाणे लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात, तसेच काँग्रेसही वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आपल्या सोबत जोडून घेते असते. हिंदू धर्मात जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी भगवान हनुमान आहेत. जे दोनदा लग्न करतात, त्यांचे वेगळे देव आहेत. जे दारू पितात, त्यांच्यासाठी दुसरे देव आहेत", असे म्हणत तेलंगणाचे हिंदूद्वेष्टे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी देवी-देवतांचा अपमान करत गरळ ओकल्याचे पाहायला मिळतेय. मंगळवारी हैदराबाद येथील गांधी भवनमध्ये झालेल्या तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी च्या कार्यकारिणी बैठकीत रेड्डी (Revanth Reddy) यांनी आपल्या अकलेचे तारे तोडल्याचे दिसून येत आहे.(Revanth Reddy)
 
मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींच्या (Revanth Reddy) या विधानाला तेलंगणा भाजपने हिंदूंच्या श्रद्धेवर आघात म्हटले असून त्यांनी माफीची मागणी सुद्धा केली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी समाजमाध्यमांवर याप्रकणी लिहिले की, काँग्रेसला हिंदूंबद्दल खोलवर द्वेष आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. काँग्रेस हा नेहमी एआयएमआयएम पुढे झुकणारा पक्ष राहिला आहे. ज्युबिली हिल्स पोटनिवडणूकीदरम्यान देखील रेड्डी (Revanth Reddy) यांनी 'काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस' असे वक्तव्य जाहीरपणे केले होते. हैदराबादमध्ये एआयएमआयएमचा प्रभाव अधिक आहे. काँग्रेस आणि एआयएमआयएम मधील काही राजकीय व्यवहारांमुळे भाजप असा दावा करते की तेलंगणा सरकार हिंदू हितांचा विचार करत नाही.(Revanth Reddy)
 
हेही वाचा : Datta Jayanti : पडघा येथील दत्तजयंतीला १२२ वर्षांची परंपरा  
 
काँग्रेसमध्ये गेल्यानंतर रेवंथ रेड्डींच्या (Revanth Reddy) रक्तात काँग्रेसी हिंदुद्वेषीपणा भिनलाय का? एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषण कसे द्यावे, हे देखील त्यांना आता समजवावे लागेल? अशा मुख्यमंत्र्यांविरोधात कोण कारवाई करणार, हाही प्रश्नच आहे. जेव्हापासून असदुद्दीन ओवैसींसोबत रेड्डींनी (Revanth Reddy) हातमिळवणी केली, तेव्हापासून ते इस्लाम स्विकारण्याच्या मार्गावर आहेत की काय; असा प्रश्न पडतो, रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांचा खरा चेहरा आज उघडा पडला आहे.
- टी राजा सिंह, तेलंगणा