मुंबई : (Rashtriya Swayamsevak Sangh) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) शताब्दीपर्यंतच्या प्रवासात संघाच्या स्वयंसेवकांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक सेवा, शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रनिर्मिती या प्रत्येक क्षेत्रात संघकार्य प्रभावीपणे सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून राष्ट्रभाव जागवण्याचे कार्य संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh) केले आहे, असे मत राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी व्यक्त केले. ते नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) विदर्भ प्रांत प्रचार विभागाच्या वतीने आयोजित मासिक जागरण पत्रिका-विदर्भ हुंकारच्या 'समर्पणाचा शतकोत्सव' या संघशताब्दी वर्ष विशेषांकाच्या विमोचन कार्यक्रमात बोलत होते.(Rashtriya Swayamsevak Sangh)
ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'विदर्भ हुंकार'च्या विशेषांकाचे प्रकाशन होणे, ही आनंदाची बाब आहे. १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) स्थापना केली. हिंदू समाजाचे संघटन, सांस्कृतिक राष्ट्रवादाची उपासना आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची भावना या उद्देशाने सुरू झालेला संघ आज जगातील सर्वात मोठी, शिस्तबद्ध आणि स्वयंसेवकांवर आधारलेली संघटना म्हणून ओळखली जाते.(Rashtriya Swayamsevak Sangh)
ते पुढे म्हणाले की, संघ संविधान विरोधी असल्याची टीका निरर्थक असून, संविधानाचे काटेकोरपणे पालन करणारी संघासारखी (Rashtriya Swayamsevak Sangh) दुसरी कुठलीही संघटना भारतात अस्तित्वात नसल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रचारकांनी समर्पित भावनेने केलेल्या कार्यामुळे पूर्वोत्तरातील राज्यांची भारताशी नाळ जुळून राहिल्याचा तसेच केरळ आणि त्रिपुरा राज्यांमध्ये हिंदुत्वाच्या विचारांचा होणारा विजय केवळ संघामुळेच शक्य झाल्याचा उल्लेखही त्यांनी गौरवाने केला.(Rashtriya Swayamsevak Sangh)
या समारंभात व्यासपीठावर विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, नागपूर महानगर सहकार्यवाह दिनेश गौर आणि नागपूर महानगर प्रचार प्रमुख ब्रजेश मानस उपस्थित होते. या अंकाचे संपादन विश्व संवाद केंद्राचे प्रमुख आणि 'विदर्भ हुंकार'चे संपादक चारुदत्त कहू यांनी केले असून संपादन सहाय्य प्रसाद बरवे यांनी केले आहे.(Rashtriya Swayamsevak Sangh)
नागपूर महानगर सहकार्यवाह दिनेश गौर याप्रसंगी बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh) समाज परिवर्तनासाठी पंचपरिवर्तन ही संकल्पना मांडली आहे. सामाजिक समरसता, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशीचा आग्रह आणि नागरिक कर्तव्यबोध हे पंचपरिवर्तनाचे आधारस्तंभ आहेत. या मूल्यांची अंमलबजावणी स्वयंसेवक आपल्या दैनंदिन जीवनातून करतात. निःस्वार्थ सेवा, शिस्त, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा हे स्वयंसेवकांच्या समर्पणाचे प्रमुख गुण आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सकारात्मक परिवर्तन घडवणे हेच संघकार्याचे मुख्य ध्येय आहे.(Rashtriya Swayamsevak Sangh)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.