Sharad Ponkshe : हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे : शरद पोंक्षे

    29-Dec-2025   
Total Views |
Sharad Ponkshe

मुंबई : (Sharad Ponkshe) भारत हा महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन विचारसरणींवर उभा राहिलेला देश आहे. १९२० ते १९४७ हा फक्त गांधी पर्वाचाच इतिहासात शिकवला गेला. सावरकरांसारखे व्यक्तीमत्वं सुद्धा एका हिमालयासमान आहे. मनुष्य ही आपली जात, माणुसकी हा धर्म आणि संपूर्ण पृथ्वी हा माझा राष्ट्र आहे; हे त्यांचे अंतिम ध्येय होते. त्यामुळे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे. असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केले.
 
राधे राधे फाउंडेशन आयोजित 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर विचारांचा जागर करणारा कार्यक्रम गोरेगाव येथे संपन्न झाला. यावेळी शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दैदिप्यमान विचार उपस्थितांसमोर प्रकर्शाने मांडले. यावेळी राधे राधे फाऊंडेशनचे संस्थापक संदीप जाधव उपस्थित होते.(Sharad Ponkshe)
 
शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) पुढे म्हणाले, धर्मांतरणाची मुळात गरज काय? जर सगळे धर्म सारखे आहेत, सर्व धर्म समभाव आहे, कुठलाच थर्मग्रंथ जर वाईट शिकवत नाही मग धर्मांतर करण्याची गरजच नाही. समस्त मनुष्यजातीचे भले हिंदूत्वच करणार आहे. म्हणून आता विश्वात्मके देवे फक्त हिंदू धर्मांतलाच संत म्हणतो. इतर कुठल्याही पंथातील एकही संत विश्वाची चिंता करताना दिसत नाही. ते फक्त त्याच्या पंथाची आणि धर्माची चिंता करताना दिसतात.(Sharad Ponkshe)
 
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल नारकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी वर्ग उपस्थित होते.
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक