मुंबई : (Dr. Mohan Bhagwat) तेथील परंपरा, संस्कृतीने त्यांना तसे घडवले आहे, परंतु भारताची संस्कृती नेहमी मानव जातीच्या कल्याणाचा विचार करते. त्यामुळेच भारत विश्व गुरु बनणे हे जगाच्या कल्याणासाठी आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले. ते रविवारी हैद्राबाद येथील कान्हा शांती वन येथे विश्व संघ शिबिराच्या समारोपीय भाषणात बोलत होते.(Dr. Mohan Bhagwat)
सरसंघचालक म्हणाले (Dr. Mohan Bhagwat) की, मेक्सिकोपासून सायबेरियापर्यंत हजारो वर्षांपूर्वीच हिंदूंनी कोणताही देश न जिंकता आणि कोणाचाही धर्म न बदलता संस्कृती, गणित, आयुर्वेद आणि इतर गोष्टी देऊन विश्वाला उन्नत केले. सध्या तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. एआय चे युग येत आहे. भविष्यातही अनेक नवनवीन गोष्टी येतील. परंतु तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम आपल्यार होणार नाहीत याची काळजी घेतली पाहीजे. तंत्रज्ञानाने मानवाला नाही तर मानव तंत्रज्ञानाला चालवेल याची देखील दक्षता घ्यावी लागेल.(Dr. Mohan Bhagwat)
ते म्हणाले (Dr. Mohan Bhagwat) की, जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या हिंदूनी असे जीवन जगले पाहिजे की, इतरांनी त्यांच्याकडून शिकावे. उच्च आदर्शासह हिंदूंनी सर्वत्र 'धर्म' स्थापित केला पाहिजे. संघाचे स्वयंसेवक भारतात हेच कार्य करत आहेत, सातत्याने हे कार्य करत असल्याने आज समाजाचा विश्वास प्राप्त झाला असून सर्वत्र प्रशंसा होत आहे. जगात विविध देशात राहणाऱ्या भारतीयांनी आपली तिथली जबाबदारी पार पाडावी.(Dr. Mohan Bhagwat)
जगभरात हिंदू स्वयंसेवक संघ, हिंदू सेवा संघ, विश्व हिंदू परिषद या संघटनांच्या माध्यमातून त्या देशांतील हिंदूंचे संघटन केले जाते. या संघटनांच्या स्वयंसेवकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे दर पाच वर्षांनी भारतात एकत्रिकरण केले जाते. यावर्षीचे एकत्रिकरण हैद्राबाद येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे २००० प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाची थीम 'धर्मे सर्वम् प्रतिष्ठाम्' अशा स्वरूपाची होती.(Dr. Mohan Bhagwat)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.