New Year's Celebration : थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचे सेलिब्रेशन जीव संभाळून करा,
मद्यपी चालकांवर ठाणे पोलिसांची करडी नजर
29-Dec-2025
Total Views |
ठाणे : (New Year's Celebration) थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत (New Year's Celebration) स्वतःचा तसेच, इतरांचाही जीव संभाळून करा, असे आवाहन ठाणे शहर वाहतुक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी केले आहे. यंदा मनपा निवडणुक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभुमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयात ५४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असुन वाहतुक शाखेचे ७३९ इतके मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. असेही उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले.(New Year's Celebration)
थर्टी फर्स्ट व नववर्ष (New Year's Celebration) स्वागता सोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण- डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा आणि भिवंडी-निजामपुर महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतुक शाखेमध्ये ५९ अधिकारी व ६८० कर्मचारी असे एकुण ७३९ इतके मनुष्यबळ तैनात केले आहे. आयुक्तालय क्षेत्रात एकुण ५४ ठिकाणी वाहतुक पोलिसांची नाकाबंदी असुन यात येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजणोली नाका ही ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत. या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धांगडधिंगा करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.(New Year's Celebration)
दरम्यान, यंदा २०२५ या वर्षात लोक अदालतमध्ये ( न्यायालयात) १ लाख ४२ हजार ६०७ ई चलन कारवाई करण्यात आली असुन एकुण १४ कोटी ३४ लाख ४३ हजार २०० इतका दंड वाहन चालकांनी न्यायालयात भरणा केला आहे.
मद्यपी चालक घटले - नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये संख्या घटली
थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष (New Year's Celebration) साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत मद्यपी चालकांची संख्या घटली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ९४५ ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या केसेस झाल्या तर, डिसेंबरमध्ये ६४६ इतक्याच केसेस झाल्या आहेत. यामध्ये ५१ ब्रेथ ॲनालायझर मशिनद्वारे चालकांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. ड्रंक अँड ड्रॉइव्ह करणारे आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येणार असून याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. थर्टी फर्स्ट आणि २०२६ च्या स्वागतानिमित्त बार, हॉटेल, धाबे, पब, फार्महाऊस यासह निसर्गरम्य ठिकाणे, मनोरंजन पार्क आदीच्या संचालकांना मद्यपी चालकांविषयी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(New Year's Celebration)
ई चलन थकबाकी भरण्यासाठी उमेदवारांची लगबग
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर तसेच भिवंडी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता उमेदवारी अर्ज भरताना, वाहनांवरील ई चलन दंड थकीत असता नये. असा नियम आहे. ई चलन दंड थकीत असेल तर उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात उमेदवारांची लगबग सुरूच आहे. आजपावेतो ३१० उमेदवारांनी थकीत ई चलनापोटी तब्बल ११ लाख ५० हजार ५५० इतका दंड जमा केला आहे. यात ठाणे - १०४, उल्हासनगर - ०८, भिवंडी - ११७ आणि(New Year's Celebration)
केडीएमसी क्षेत्रातील - ८१ उमेदवारांनी थकीत ई चलान भरले आहेत
थर्टी फर्स्ट (New Year's Celebration) तसेच नवीन वर्षाचे स्वागत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता ठाणे वाहतूक विभागाचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण उत्साहाच्या भरात मद्यपान करून वाहन चालवणे, स्टंटबाजी करणे किंवा भरधाव वेगाने गाडी चालवणे यामुळे अपघात घडुन स्वतःचा तसेच इतरांच्याही जीवाला धोका होऊ शकतो; त्यामुळे शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.(New Year's Celebration)