Mahfuz Alam : बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलनकर्त्यांमध्ये फूट, ‘नेत्यानी’ साथ सोडली

महफूज आलमचा "एनसीपी" मधून राजीनामा

    29-Dec-2025   
Total Views |
Mahfuz Alam

मुंबई : (Mahfuz Alam) बांगलादेशात गेल्या वर्षी २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे शेख हसीना सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप झाला होता. त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते एकमेकांपासून दूर होत चालल्याचे दिसू लागले आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे महफूज आलम. (Mahfuz Alam) आलम यांनी नॅशनल सिटीझन पार्टी मधून राजीनामा दिला आहे. आलम (Mahfuz Alam) हे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे सल्लागार आहेत आणि त्यांना एनसीपीचे ‘गुरू’ मानले जाते.(Mahfuz Alam)
 
अशी माहिती आहे की, एका फेसबुक पोस्टमध्ये महफूज आलम यांनी आपला पक्ष सोडण्याची घोषणा केली. आलम (Mahfuz Alam) यांनी लिहिले, “सध्याच्या परिस्थितीत जुलैमधील माझ्या सहकाऱ्यांबद्दलचा माझा आदर, स्नेह आणि मैत्री संपलेली नाही. मात्र, मी या पक्षाचा भाग होणार नाही.”
 
आलम (Mahfuz Alam) यांनी पुढे लिहिले, “मला जमात-एनसीपी आघाडीकडून प्रस्ताव मिळाला, हे खरे नाही. पण ढाका मतदारसंघातील कोणत्याही जागेवरून जमात-एनसीपी आघाडीचा उमेदवार होण्यापेक्षा माझी जुनी भूमिका टिकवून ठेवणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.”(Mahfuz Alam)
 
महफूज आलम (Mahfuz Alam) यांच्यापूर्वी तजनुवा जबीन यांनीही एनसीपीमधून राजीनामा दिला होता. त्या एनसीपीच्या संयुक्त संयोजक होत्या. जुलै २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनात जबीन यांना एक प्रमुख चेहरा मानले जाते. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीत त्या ढाका-१७ या हाय-प्रोफाइल मतदारसंघातून उमेदवार होत्या.(Mahfuz Alam)
 
राजीनाम्यांवर एनसीपी संयोजक नाहिद इस्लाम यांचे वक्तव्य
 
एनसीपी मधील राजीनामा सत्रानंतर संयोजक नाहिद इस्लाम यांनी जमात-ए-इस्लामीसोबतच्या आघाडीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रविवारी (२९ डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत नाहिद यांनी सांगितले, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत एनसीपी साठी एकट्याने निवडणूक लढवणे शक्य नाही. म्हणूनच आम्ही आठ समान विचारांच्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.” त्यानी पुढे स्पष्ट केले, “ही कोणतीही वैचारिक आघाडी नाही. ही केवळ निवडणूक समजूत आहे. एनसीपी आपली उद्दिष्टे आणि तत्त्वे कायम पाळत राहील. सध्या आमचे लक्ष निवडणूक सहकार्यावर आहे.”(Mahfuz Alam)
  

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक