Amol Kolhe Meets Ajit Pawar : अमोल कोल्हे यांनी घेतली अजित पवारांची भेट

    27-Dec-2025
Total Views |
Amol Kolhe Meets Ajit Pawar 
 
पुणे : (Amol Kolhe Meets Ajit Pawar) दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता मावळली असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने अजित पवारांची भेट घेतली आहे. पवारांच्या घरी साधारण अर्धातास भेट झाली.
 
पुण्यातील राजकीय वातावरणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe Meets Ajit Pawar) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पवारांच्या पुण्याच्या जिजाई निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये युतीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ही भेट सुमारे अर्धा तास चालली. (Amol Kolhe Meets Ajit Pawar)
 
हेही वाचा : Navnath Ban : गावकीपुढे भावकी चालत नाही ; नवनाथ बन यांची टीका 
 
कालच दिवस पुण्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरला. शरदचंद्र पवार गटाचे पुण्यातील प्रमुख नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले होते. या भेटीदरम्यान जागावाटपावर तडजोड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवार यांनी तुतारी चिन्हावरील उमेदवारांनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी केली. या मागणीमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी रात्री महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली होती. (Amol Kolhe Meets Ajit Pawar)